Ram Shinde On Sanjay Raut : महाविकास आघाडीचे तुकडे झालेत आता तरी थांबा! राम शिंदेंचा राऊतांवर निशाणा

BJP Vs MVA : राऊत, मलिकांवरील आरोपांत काहीतरी तथ्य
Sanjay Raut, Ram Shinde
Sanjay Raut, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

सुशील थोरात

Ahmednagar News : संजय राऊत महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम करत होते, त्या आघाडीतील एक-एका पक्षाचे दोन-दोन तुकडे झाले. यास फक्त राऊतच कारणीभूत आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी थांबण्याची गरज आहे. अन्यथा यापुढेही यात काही भर पडण्याची शक्यता आहे, अशी बोचरी टीका करत भाजप आमदार राम शिंदेंनी ठाकरे गटाचे खासदार राऊतांवर निशाणा साधला. (Latest Political News)

नगरमधील एका कार्यक्रमात बोलताना राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, "जो चुका करतो आणि चुका लोकांच्या निदर्शनास येत नाही तोपर्यंत तो उजळमाथ्याने वावरत असतो. राऊतांना चूक केल्यानेच अटक झाली, जेलमध्ये जावे लागले. यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर अन्याय करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. कुणाचाही काहीही झाले तर भाजपला दोषी ठरवायचे हे आता राऊतांनी बंद करायला हवे."

Sanjay Raut, Ram Shinde
Ramdas Athawale News : महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन अन् पिंपरी महापालिकेत १५ जागांची आठवलेंची मागणी

देशद्रोहाचा कायदा रद्द केतल्यानंतर खासदार राऊतांनी सरकारवर टीका केली. Sanjay Raut संजय राऊत म्हणाले, "देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याचे फार कौतुक सांगू नका. तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायदे केले आहेत. विरोधकांना जेरीस आणण्यासाठी या कायद्यांचा वापर केला जातो", अशी टीका केली होती. याबाबत राम शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

Sanjay Raut, Ram Shinde
Ambadas Danve On adjournment : विकासकामांच्या स्थगिती विरोधात न्यायालयात धाव घ्या, दानवेंचा सल्ला..

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना जामीन मिळाल्याने आमदार रोहित पवारांनी 'उशिरा का होईना यांना न्याय मिळाला' असे म्हटले आहे. यावर शिंदे म्हणाले, "न्यायालयाच्या एखाद्या निकालावरती प्रतिक्रिया देणे योग्य नाही. एखाद्यावर झालेला आरोप, त्यानंतर झालेला जामीन ही एक प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला विरोधक म्हणून काही लोक चुकीची काम करतात, त्यावर पांघरून कदापिही टाकता येणार नाही. एखाद्यावर आरोप होतो आणि अनेक दिवस त्यांना जामीन होत नाही, याचा अर्थ आरोपांमध्ये काहीतरी तथ्य आहे", असेही वक्तव्य शिंदेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com