Vishwas Barbole-Sharad Pawar
Vishwas Barbole-Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विश्वास बारबोलेंचं अखेर ठरलं : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

प्रशांत काळे

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी (Barshi) तालुक्याच्या राजकारणात मागील पाच दशके बारबोले कुटुंबांनी वेगळा ठसा उमटवला आहे. (कै.) अर्जुनराव बारबोले, विश्वास बारबोले, कृष्णराज बारबोले यांनी सामान्य जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेऊन विकासाची दिशा देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) ध्येय धोरणाची तालुक्यात पुन्हा एकदा बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गुरुवारी (ता. 27 ऑक्टोबर) बार्शीमध्ये येत आहेत. या वेळी विश्वास बारबोले (Vishwas Barbole) हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बारबोलेंना काय कानमंत्र देतात, याकडे बार्शीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Vishwas Barbole will join NCP in the presence of Sharad Pawar on Thursday)

कै.अर्जुनराव बारबोले वैरागच्या संतनाथ (भोगावती) सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, त्यावेळी पवार कुटुंबाच्या संपर्कात येताच त्यावेळी राष्ट्रवादी (एस) पक्षातून विधानसभेची उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती, त्यातूनच राजकारणाचे बाळकडू विश्वास बारबोले यांना मिळाले. विश्वास बारबोले यांनी १९९१ मध्ये प्रथमच बार्शी नगरपरिषदेचे नगरसेवक झाले आणि उपनगराध्यक्षपद पटकावले. बार्शी शहर सुधार आघाडी स्थापन करुन १९९६ मध्ये पुन्हा विजय प्राप्त करुन नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. परत २००१ मध्ये नगराध्यक्ष झाले.

राजकारणामध्ये स्थिर होत असताना २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. पण, पक्षाने नाकारल्यानंतर २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचे समवेत राहून नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार यंत्रणा राबवली होती.

आमदार राजेंद्र राऊत यांचे समवेत नगर परिषदेवर पाच वर्षांपूर्वी विजय पटकावला अन् सुपुत्र कृष्णराज बारबोले उपनगराध्यक्ष झाले. तालुक्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न बारबोले कुटुंब करीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून परिवर्तन घडणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT