मंत्रिमंडळ विस्तार ठरला; राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार : फडणवीसांची माहिती

सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत, त्यामुळे अनेकांवर इतर विभागाचा पदभार आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet expansion)) लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे. या विस्तारात राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, सध्या मंत्रिमंडळात केवळ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश आहे. (Devendra Fadnavis gave hints at Cabinet expansion)

राज्याच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय १८ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ, तर भारतीय जनता पक्षाचे नऊ मंत्री आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांच्या जोडीला आता राज्यमंत्रीही नव्या विस्तारात असतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
बंद पडलेले ‘व्हॉट्‌स ॲप’ भारतात दोन तासानंतर सुरू झाले

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत, त्यामुळे अनेकांवर इतर विभागाचा पदभार आहे. राज्यमंत्री नसल्याने अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयाचा पदभार आहे, तो कमी करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. मात्र, नव्या विस्तारात कोणाला किती मंत्रिपदे मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
मनसे आमदाराने युतीचे संकेत देताच श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद आणि नऊ कॅबिनेट मंत्रीपदे मिळालेली आहेत. आगामी विस्तारात शिंदे गटाला किती मंत्री पदे मिळतात आणि कोणती मंत्रालये मिळतात हे पाहावे लागणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडे १०६ आमदारांचे पाठबळ आहे. तुलनेने शिंदे गटाकडे ५० च्या आसपास आमदार आहेत, त्यामुळे आता शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे भाऊबीजेला दिलीप कोल्हेंकडे मागणार ‘ही’ ओवाळणी!

दुसरीकडे, शिंदे गटातील अनेक आमदार पहिल्या विस्तारापासूनच मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. अनेकांनी तर माध्यमांकडे तशी इच्छा बोलून दाखवली आहे. आमदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी पहिल्या विस्तारानंतर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com