Shivaji Maharaj Wagh Nakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivaji Maharaj Wagh Nakh : लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा

Rahul Gadkar

Kolhapur News, 8 July : राज्यातील महायुती सरकारवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी मोठा आरोप केला आहे. लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा खबळजनक दावा सावंत यांनी केला आहे.

तसंच सरकारकडून शिवप्रेमींची फसवणूक केली जात असून या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सावंत हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम संचालकांनी आम्हाला पाठवलेल्या पत्रात ही वाघनखं शिवरायांची असल्याबाबतचा आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याच म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे.

तसंच सरकारने शिवप्रेमींची फसवणूक करू नये. शिवरायांची खरी वाघनखं साताऱ्यातील छत्रपती घराण्यातच आहेत. याबाबत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी स्वतः समोर येऊन बोलावं. असं आवाहन देखील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारने या या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नये असं देखील सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, "लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही.

त्यामुळे या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू. शिवाय त्यांनी हे वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्याचे लिहणे बंधनकारक केले असतानाही राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT