Sambhajiraje Chhatrapati : 13 जुलैला शिवभक्त विशाळगडावर; अतिक्रमण हटवण्‍यासाठी संभाजीराजे आक्रमक!

Ex-MP Sambhajiraje Chhatrapati on Vishalgad Fort Encroachment : तेव्हा काय करणार हे आताच सांगणार नाही असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे. शासकीय विश्राम गृहात आयोजित शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSakarnama

Sambhajiraje Chhatrapati News : किल्ले विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणा विरोधात शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील आता किल्ले विशाळगडा या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला असताना अद्याप अतिक्रमणाबाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याने शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी राज्यातील गडप्रेमी आणि शिवभक्तांची बैठक घेऊन 13 जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांसह दाखल होणार. त्याठिकाणी काय करणार हे आताच सांगणार नाही असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे. शासकीय विश्राम गृहात आयोजित शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते.

Sambhajiraje Chhatrapati
Dhananjay Mahadik : महाडिकांना काँग्रेसवर वेगळाच संशय; लाडक्या बहिणींना केलं सावध...

काही वर्षापासून किल्ले विशाळगडावर अतिक्रमण आहे. राजरोसपणे अतिक्रमण वाढत असताना प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. यात्रेच्या निमित्ताने कत्तलखाने आहेत. कोंबड्या, बकरी कापल्या जातात. मद्यपान होत असून दिवसाढवळ्या जुगाराचे डाव बसतात. त्यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात आले असून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी शिवभक्तांचा प्रयत्न आहे.

दीड वर्षापूर्वी बैठक घेऊन विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना प्रशासनला दिल्या होत्या. दीड वर्षात शासन, प्रशासनाने यासाठी काहीही केले नाही. म्हणून 13 जुलैला दुपारी दोन वाजता माझ्यासह राज्यातील शिवभक्त विशाळगडावर धडक देतील, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी रविवारी दिला.

Sambhajiraje Chhatrapati
Eknath Shinde Group : सोलापूरच्या डॉ. ज्योती वाघमारेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी...

दरम्यान, या बैठकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच जबाबदार धरले आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला आल्यानंतर राजदरबारावरून विशाळगड अतिक्रमण मुक्तीसंबंधी शिवभक्ताच्या मनात जे आहे तेच होईल, असे सांगितले होते. पण अद्याप अतिक्रमण मुक्त झालेला नाही. त्यामुळे या तिघांच्या मनात काय आहे हे शिवभक्तांना आता पाहायचच आहे. असं सूचक विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com