Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर; रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी; उजनीचे आवर्तन 35 दिवस चालणार...

Ujani Dam Water Supply : फेब्रुवारीअखेर उजनी कालवा समितीची बैठक घेऊन धरणातील पाण्याचं नियोजन करण्यात येईल. देगाव, एकरुख कालव्यालाही उद्यापासून आम्ही पाणी सोडत आहोत.

विश्वभूषण लिमये

Solapur, 03 January : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी उद्यापासून (ता. 04 जानेवारी) आवर्तन सोडले जाणार आहे. हे आवर्तन तब्बल 35 दिवस चालणार आहे. पुढील फेब्रुवारीअखेर उजनी कालवा समितीची बैठक घेऊन पाण्याचं नियोजन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

उजनी कालवा सल्लागार समितीची पहिलीच बैठक सोलापुरात (Solapur) झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बैठकीत घेण्यात आलेला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पहिल्यांदाच सोलापुरात झाली आहे. यापूर्वी ती बहुतांश वेळा पुण्यात व्हायची. ती आम्ही प्रथमच सोलापुरात घेतली आहे.

उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्याच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याविषयी चर्चा करण्यात आली. उजनी धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल असे नियोजन करावे लागणार आहे. धरणातील पाण्याचे मेपर्यंत नियोजन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी उद्यापासून (ता. 04 जानेवारी) पहिले आवर्तन सोडलं जाणार, हे आवर्तन तब्बल 35 दिवस चालणार आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नमूद केले.

विखे पाटील म्हणाले, फेब्रुवारीअखेर उजनी कालवा समितीची बैठक घेऊन धरणातील पाण्याचं नियोजन करण्यात येईल. मागील उन्हाळ्यात आमचा तो प्रयत्न होता, तोच याही उन्हाळ्यात राहील. देगाव, एकरुख कालव्यालाही उद्यापासून आम्ही पाणी सोडत आहोत.

उजनी धरणातून वाळू उपसण्यासाठी निविदा काढली पाहिजे. धरणात गाळमिश्रित वाळू मोठ्या प्रमाणात आहे. वाळू उपसल्यामुळे सरकारला त्यातून उत्पन्नही मिळेल. मात्र, तसा काही निर्णय घ्यायचा म्हटलं तर शासनावर आरोप होतात. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. भूमिका कितीतरी चांगली असली तरी निर्णय घेण्यावर आरोप होतात, असेही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या निकालाने विरोधक जमिनीवर आलेत

विरोधकांची विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाली आणि लोकसभेला त्यांनी फेक नेरिटीव्ह सेट करून यश मिळवले होते. विधानसभेलाही तसं यश मिळेल, अशा धुंदीत ते वावरत होते. पण, आता ते जमिनीवर आलेले आहेत आणि लोकांनी त्यांना धोबीपछाड दिलेली आहे, त्यामुळे विरोधक कारण शोधत आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते धडपडत आहेत, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT