Shahajibapu Patil News, Maharashtra Political Crisis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आम्हाला कोंढलं नाय...मारलं नाय...हाणलं नाय : शहाजीबापूंची पुन्हा डायलॉग बाजी!

आम्ही गुवाहाटीमध्ये स्वखुशीने आलो आहोत : शहाजी पाटील

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : ‘‘आम्ही एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या सहवासात आहोत. ही आमची राजकीय चळवळ आणि लढाई आहे. आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही ही लढाई लढत आहोत. आम्हाला कोणीही या ठिकाणी घेऊन आलं नाही, कोंढलं नाय, मारलं नाय, हाणलं नाय. अफवा पसरवू नका. आम्ही जे आलो आहेत, ते स्वखुशीने गुवाहाटीमध्ये आलो आहोत,’ असे शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी सांगितले. (We have come to Guwahati voluntarily : Shahaji Patil)

गुवाहाटीमध्ये गेलेल्या एका एका बंडखोर शिवसेना आमदारांकडून आपण तिकडे का गेलो आहेत, हे सांगायाला सुरुवात केली आहे. बंडखोर आमदारांकडून त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे. त्यानुसार आज आमदार शहाजी पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार पाटील म्हणाले की, आम्ही ४० आमदारांनी मिळून एकजुटीने, विचार करून एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला आणले आहे. आमच्या मतदारसंघातील जनता आणि आमचं आमच्या मतदारसंघातील भविष्याचं राजकारण वाचवा, अशी विनंती आम्ही शिंदे यांना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचं राजकारण उद्‌ध्वस्त होतंय.(Shahajibapu Patil News)

आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि मतं मांडत असताना हिंदूह्‌दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मत द्या, असे आवाहन केले होते. तसेच, त्यावेळी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचं नाव घेत जनतेसमोर जाऊन मतं मागितली होती. लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलं. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत सांगोल्यात शिवसेनेला १६०० मतं होती. मी २०१३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१४ च्या निवडणुकीत ७६ हजार मतं केली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत एक लाख मतं घेत भाई गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा रोवला आणि मी विजयी झालो, असे ही शहाजी पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सांगोल्याचा निधी रोखला

माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT