Solapur, 28 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आम्ही एकत्र मिळून ठरवू. आमच्यात काही झालं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ठरवतील तसे आम्ही करू, असे माजी आमदार दिलीप माने यांनी म्हटले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) निवडणुकीत आमदा सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने १३ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले आहे. विजयानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार माने यांनी सभापतिपदाबाबत भाष्य केले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली आहे. आमचे पॅनेल प्रमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आम्हाला जवळजवळ ७५ टक्के मते मिळाली आहेत, असा दावाही दिलीप माने (Dilip Mane) यांनी केला आहे.
दिलीप माने म्हणाले, ग्रामपंचायत मतदारसंघात आम्ही कुठे चुकलो, याचं आम्हाला आत्मपरीक्षण करावा लागेल. विरोधी गटातील तीन उमेदवार निवडून आले असले तरी बाजार समितीचा कारभार आम्ही एकोप्याने करू. शेतकरी हितासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, आमच्या विजयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, असाच कारभार आम्ही करू.
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र सभापतिपदाबाबत आमचं ठरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आमचं अगोदरचं ठरलंय, असे म्हटले आहे, त्यामुळे बाजार समितीच्या सभापतिपदाबाबत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी विधाने केल्यामुळे नेमकं सभापती कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे.
सोलापूर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत, तर सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे पॅनेलचा एक उमेदवार विजयी झाला आहे. या मतदारसंघात त्यांना तीन जागांवर नुकसान झाले आहे. सोसायटी मतदारसंघातील सर्वच सर्व ११ जागा मात्र माने-हसापुरे पॅनेलने जिंकल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.