Sachin Kalyanshetti : सोलापूर बाजार समिती सभापतिपदाबाबत कल्याणशेट्टी म्हणतात, ‘आमचं ठरलंय...मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला...’

Solapur Bazar Samiti Sabhapati Post : ग्रामपंचायत मतदारसंघात कुठे आम्ही कमी पडलो, याबाबत आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल. आम्हाला 18 चे 18 सीट निवडून येणे अपेक्षित होते. पण, दुर्दैवाने ग्रामपंचायत मतदारसंघातील आमच्या तीन जागा गेल्या आहेत. त्याचा आम्ही नक्की विचार करू.
Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Suresh Hasapure
Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Suresh HasapureSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 April : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्हाला 18 पैकी 18 जागा निवडून येणे अपेक्षित होते. दुर्दैवाने ग्रामपंचायत मतदारसंघातील आमच्या तीन सीट पडल्या. त्याबाबत आम्ही कुठे कमी पडलो. याचा नक्की विचार केला जाईल. तसेच, बाजार समितीच्या सभापतिपदाबाबत आमचं ठरलंय...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आमचं अगोदरचं ठरलंय, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Solapur Bazar Samiti Election) आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने 13 जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले आहे. विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी सभापतिपदाबाबत भाष्य केले आहे.

सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti )म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीतील विजय म्हणजे शेतकरी बांधवांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. सोसायटी मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी होती. मतदानाची आकडेवारी पाहिली, तर विरोधी पॅनेलला मिळालेल्या मतांच्या तीनपट मते आम्हाला मिळाली आहेत. शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं आहे. अठरापैकी 15 सीट आमचे निवडून दिले आहेत, ज्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार मानतो.

Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Suresh Hasapure
Solapur Bazar Samiti Result : सोलापूर बाजार समितीत अखेर माने-कल्याणशेट्टी-हसापुरे पॅनेलची बाजी; 13 जागांवर दणदणीत विजय, देशमुखांना तीन जागा, दोन अपक्ष विजयी

ग्रामपंचायत मतदारसंघात कुठे आम्ही कमी पडलो, याबाबत आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल. आम्हाला 18 चे 18 सीट निवडून येणे अपेक्षित होते. पण, दुर्दैवाने ग्रामपंचायत मतदारसंघातील आमच्या तीन जागा गेल्या आहेत. त्याचा आम्ही नक्की विचार करू. या तीनही सीट पडायला नको होत्या. पण, त्या का पडल्या, याचीही नक्की विचार करण्यात येईल, असेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

कल्याणशेट्टी म्हणाले, सभापतिपदासाठी आमच्यात कोणतीही चुरस नाही. निकालानंतरही आम्ही एक आहोत. दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आणि आमचं सगळ्यांचं ठरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आमचं अगोदरच ठरलं आहे

Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Suresh Hasapure
Solapur Bazar Samiti Result : सोसायटी मतदारसंघात कल्याणशेट्टी-माने-हसापुरेंची मुसंडी; सर्व 11 उमेदवार तब्बल 200 मतांनी आघाडीवर

आमदार सुभाष देशमुख यांचे तीन उमेदवार निवडून आले आहेत, त्यासाठी त्यांचंही मी अभिनंदन करतो. राजकारणात हार-जीत होत असते. इथून पुढे बाजार समितीचे काम करताना विरोधात तीन उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन काम करू. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून नावारूपास आणू, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com