Hasan Mushrif & Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News : आम्हीही काठी घेऊन दारात बसू; सतेज पाटलांच्या विधानावर मुश्रीफांचा पलटवार

Political News : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काठी घेऊन आहे, असे विधान केल्यानंतर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे.

Rahul Gadkar

Kollhapur News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काठी घेऊन आहे, असे विधान केल्यानंतर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. जर पाटील काठी घेऊन बसत असतील तर आम्हीही काठी घेऊन रात्री 1 वाजेपर्यंत बसू. काठी घेऊन बसला काय ? हे चुकीचे विधान करण्यात काहीही अर्थ नाही, अशा सूचना मुश्रीफ यांनी केल्या.

सतेज पाटील (Satej Patil) यांना काही त्रास झाला असेल किंवा धमकी मिळाली असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे. त्यांना बारा वाजेपर्यंत बसायची काय गरज आहे, असा टोलाही मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते. (Hasan Mushrif News)

नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांची 100 टक्के विजयी होतील. या सभेचा इम्पॅक्ट दोन्ही मतदारसंघातील मतदारांवर पडेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त करत वंचित आणि एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे. त्याचे परिणाम काय होतील ? हे जनताच निवडणुकीदिवशी ठरवेल, असेही मुश्रीफ म्हणाले.

सध्या शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यावर सुरू असलेल्या व्यक्तिगत टीकेवर बोलताना मुश्रीफ यांनी निवडणुकीत ज्यामुळे वाद होईल, असे मुद्दे टाळले पाहिजेत. संजय मंडलिक ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत. तो कारखाना कर्नाटकाच्या माणसाला विकला, असे धडधडीत खोटं बोलायच आणि मग या बाजूला शाहू महाराजांच्या विरोधात टीका व्हावी, याबद्दलचे जे षडयंत्र सुरू आहे हे बंद व्हावे, असे आवाहन या वेळी मुश्रीफ यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारांपेक्षा प्रवक्तेच जास्त बोलतात

नरेंद्र मोदींच्या सभेला दोन लाखांपेक्षा अधिक लोक येणार आहेत. विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरत आहे. खालच्या पातळीवरील आरोप करत आहेत. त्याने विकासावर बोलायला पाहिजे आणि व्हिजन सांगायला हवे, उमेदवाराने आतापर्यंत केलेली काम आणि पुढील काळातील व्हिजन याबाबत त्यांनी सांगावे. विकासकामावरील बोलणं सोडून खालच्या पातळीवर आरोप करून निवडणूक भरकटवण्याचे काम केले जात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा प्रवक्तेचं जास्त बोलतात, असा टोलाही मंडलिक यांनी लगावला.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT