उत्तम कुटे
Pimpri News : मावळ या एकाच नावाचा विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघही (Lok Sabha Election News) आहे. तेथे विधानसभेला अद्याप कोणाचीही हॅटट्रिक झालेली नाही. ही संधी या वेळी लोकसभेला मात्र चालून आलेली आहे. त्यामुळे तेथे ती पूर्ण होऊन रेकॉर्ड होणार का याकडे लक्ष लागले आहे. यावेळची मावळची लढत लक्षवेधी आणि अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण ती शिवसेनेच्या दोन्ही गटांतच होत आहे.
मावळमधील (Maval Lok Sabha Constituency) प्रमुख उमेदवारांत (आघाडी आणि युती) अनेक साम्ये आहेत. त्यातीलच एक खासदार होणार आहे. आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Patil), तर महायुतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तेथे उमेदवार आहेत. बारणे हे 2014 आणि 2019 चे खासदार आहेत. यामुळे 2024 ला ते निवडून आले, तर त्यांची हॅटट्रिक होणार आहे, तर वाघेरे हे पहिल्यांदा ही निवडणूक लढवित आहेत.
वाघेरे आणि बारणेंत अनेक साम्य आहेत. दोघेही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. वाघेरेंनी महापौर, तर बारणेंनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. दोघेही मराठा आहेत. दोघांचेही नातेवाईक मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीला काहीसे गावकी-भावकीचे स्वरूप आलेले आहे. दोघांनाही उमेदवारीसाठी फारसा संघर्ष करावा लागलेला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2014 ला बारणेंना लॉटरी लागली अन् नगरसेवकाचे ते थेट खासदार झाले. उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचे पहिले खासदार गजानन बाबर यांना दुसऱ्यांदा तिकीट नाकारून ते बारणेंना दिले. त्याची पुनरावृत्ती त्यांनी 2019 ला केली, तर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राहिलेल्या वाघेरेंनी शिवबंधन बांधताच तीन महिन्यांत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली.
2022 ला शिवसेना फुटली अन् मुत्सद्दी बारणेंनी राजकीय भवितव्याचा विचार करून शिंदे गटाची वाट धरली. मावळात भाजपची मोठी ताकद आहे. तिच्या जोरावर आणि मोदींच्या करिष्म्यावर बारणे दोनदा खासदार झालेले आहेत. ते ध्यानात घेऊन खासदारकीच्या हॅटट्रिकचा विक्रम करण्यासाठी भाजपशी घरोबा केलेल्या शिंदे गटात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
एवढेच नाही, तर त्यासाठी भाजपमधील आपले राजकीय विरोधक मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी तडजोड केली. कारण त्यांची मदार हे दोघे आणि त्यांच्या पक्षावरच आहे. शिंदे शिवसेनेची ताकद कमी असून मावळमध्ये सहापैकी फक्त एकच आमदार त्यांचा आहे. तर प्रत्येकी दोन हे राष्ट्रवादी आणि भाजपचे, तर एक अपक्ष आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.