Nana Patole on Congress: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole on Congress: आम्हाला 'यां'ना 2024 ला देशाचे पंतप्रधान करायचे आहे...; नाना पटोलेंनी थेट नावचं सांगितले...

Solapur Politics : केंद्र सरकार देश विकून खात आहे.

सरकारनामा ब्युरो

Nana Patole criticized BJP Government : सध्याचं केंद्रातलं सरकार हे घोषणाबाज सरकार आहे.सामान्य लोकांच्या खिशातले पैसे काढायचे, हे मोदी सरकारने ठरवलंच आहे. सध्याच्या सरकारची कृती ही महागाईची आहे. केंद्र सरकार देश विकून खात आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांना हाकलले त्याप्रमाणेच भाजपलाही हाकलायची वेळ आली आहे', अशा शब्दांत केंद्र सरकारच्या दोन हजारांच्या नोटबंदीच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (We want to make Rahul Gandhi the Prime Minister of the country in 2024...; Nana Patole)

सोलापूरात आज (२१ मे) काँग्रेसचा महामेळावा पार पडला. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशाचे पंतप्रधान करायचे आहे. तर प्रणिती शिंदे यांना आमदार करायचं आहे, त्यानंतर त्यांना मंत्रीही करू. पण त्याआधी सोलापूर जिल्ह्यातील अकरा जागांवर आपलेच आमदार निवडून आले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्वच सर्व अकरा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे खासदार असले पाहिजेत, असं तुम्ही म्हणतात. पण, ते निवडणूक लढायला तयार नाहीत, असं मला त्यांनी कानात सांगितले. तुमची इच्छा असेल तर ते निवडणुकीला उभे राहतीलही. पण या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही.

तुम्ही जबाबदारी घेणार का, असा सवाल पटोले यांनी करताच उपस्थितींमधून जबाबदारी घेणार असा प्रतिसाद मिळाला. मला सोलापूर (Solapur Politics) लोकसभेची जागा, तर जिंकायचीच आहे. पण त्याबरोबरच माढ्याची जागाही जिंकायची आहे. कारण, मला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मला तुमची हमी हवी आहे. मी सुशीलकुमार शिंदे उभा असे समजून काम केले पाहिजे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT