Sharad Pawar News : ...तर त्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांचा इशारा

Ahmednagar ncp News : आज देशामध्ये चित्र बदलते आहे. आज काही शक्ती आहेत ज्या देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आज देशामध्ये चित्र बदलते आहे. आज काही शक्ती आहेत ज्या देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरुन सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची खबरदारी घेत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

हमाल माथाडी महामंडळाच्या २१ व्या राज्य अधिवेशन आज (ता.२१) अहमदनगर (Ahmednagar) येथे झाले. या अधिवेशनामध्ये शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी पवार यांच्या हस्ते लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पवार म्हणाले, ''आज ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे ती सत्ता कष्टकरी लोकांसाठी, समाजातील लहान घटकांसाठी वापरायची समज या राजकर्त्यांना नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावाने समाजात एक तेढ निर्माण केली जात आहे,'' असा आरोप त्यांनी केला.

Sharad Pawar News
Sameer Wankhede News: समीर वानखेडेंची 'सीबीआय'कडून तीन तास चौकशी; 'या' प्रश्नांची उत्तरं वानखेडेंनी टाळली?

''या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर होऊन गेले. दोन दिवस झाले या जिल्ह्यात बाजारपेठ बंद, जातीजातीमध्ये अंतर वाढवणे, संघर्ष वाढवणे हे काम काही शक्ती करत आहेत. या शक्तींशी संघर्ष करणे हे आव्हान तुमच्या आणि माझ्यासमोर आहे. हा संघर्ष केला नाही तर कष्ट करणारा हमाल असेल, गिरणीतील कामगार असेल त्याचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही,'' असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar News
Anil Deshmukh News : तुरुंगाबाहेर आलेल्या अनिल देशमुखांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली : नरखेड ‘खरेदी विक्री’वर राष्ट्रवादीचा झेंडा

''आज महाराष्ट्रातील कोणतेही शहर बघा तेथे कष्ट करणारा खरा कोण आहे तर हमाल आणि माथाडी आहे. म्हणून या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेयची असेल तर आपल्यामध्ये एकजूट असलीच पाहिजे, आणि ती एकजूट देण्यासाठी बाबा आढाव आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्षे काम करत आहेत. त्याच्या पाठीशी शक्ती उभी करणे तुम्हा लोकांची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल याची मला खात्री आहे,'' असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com