Western Maharashtra Minister Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra : महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व; उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रिपदे!

Mahayuti Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांना बाहेर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 15 December : महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातील राजभवनासमोरील हिरवळीवर रविवारी (ता. १५ डिसेंबर) सायंकाळी पार पाडला. यामध्ये तब्बल ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असल्याचे दिसून येत असून पश्चिम महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदासह दहा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर मुंबई-कोकणाकडे नऊ, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे आठ, तर मराठवाड्याकडे सहा मंत्रिपदे असणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी नागपुरात महायुती सरकारचा (Mahayuti Government) मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांना बाहेर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील मंत्रिमंडळातील दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम या मंत्र्यांना वगळले आहे. या मंत्र्यांना वगळून अजित पवार यांनी मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रेय भरणे, इंद्रनील नाईक यांना संधी दिली आहे.

भारतीय जनता पक्षानेही (BJP) सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांनीही दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हे तिघेही नाराज असल्याचे सांगण्यात आहे. मात्र, शिंदे यांनीही भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, संजय शिरसाट यांना प्रथमच मंत्रिपदी संधी दिली आहे.

विभागीयनिहाय तीनही पक्षांना मिळालेली मंत्रिपदे

पश्चिम महाराष्ट्र

भाजप

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

जयकुमार गोरे

माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी

अजित पवार (उपमुख्यमंत्री)

दत्तात्रेय भरणे

हसन मुश्रीफ

मकरंद पाटील

शिवसेना

शंभूराज देसाई

प्रकाश आबिटकर

विदर्भ

भाजप

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

चंद्रशेखर बावनकुळे

अशोक उईके

आकाश फुंडकर

पंकज भोयर (राज्यमंत्री)

शिवसेना

संजय राठोड

आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी

इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

मराठवाडा

भाजप

पंकजा मुंडे

अतुल सावे

मेघना बोर्डीकर(राज्यमंत्री)

शिवसेना

संजय शिरसाट

राष्ट्रवादी

धनंजय मुंडे

बाबासाहेब पाटील

मुंबई-कोकण

भाजप

गणेश नाईक

मंगलप्रभात लोढा

आशिष शेलार

नितेश राणे

शिवसेना

एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)

उदय सामंत

भरत गोगावले

प्रताप सरनाईक

राष्ट्रवादी

आदिती तटकरे

उत्तर महाराष्ट्र

भाजप

राधाकृष्ण विखे पाटील

गिरीश महाजन

जयकुमार रावल

संजय सावकारे

शिवसेना

गुलाबराव पाटील

दादा भूसे

राष्ट्रवादी

माणिकराव कोकाटे

नरहरी झिरवाळ

SCROLL FOR NEXT