
Nagpur, 15 December : मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही, याची कल्पना आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्कार समारंभाला अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच मंत्रिमंडळातून ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवणे ही मोठी कसरत असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आले असावे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते. फक्त छगन भुजबळ यांचाच फक्त अपवाद होता.
रविवार दुपारी बारापर्यंत कोण मंत्री होणार, याची कोणालाच खात्री नव्हती. असे असले तरी ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुपारी दोनपर्यंत सर्व नावे गोपनीय ठेवली होती. मात्र, भुजबळ व मुंडे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र मुंडे सत्कार समारंभाला उपस्थित होते. मात्र भुजबळ शेवटपर्यंत आलेच नाहीत. तेव्हाच भुजबळ यांचे नाव कटले असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली.
या निर्णयामुळे अजित पवार यांना अनेक नेते नाराज होणार असल्याची कल्पना आली होती. त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिपदाची जागा कमी आहे आणि इच्छुकांची संख्या जास्त असे सांगून सर्वांना स्थान देता येणार नाही, हे स्पष्ट केले. हे सांगताना त्यांनी ज्यांना आता मंत्री केले आहे, त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचाच असल्याचे सांगून इतरांच्या आशाही कायम ठेवल्या आहेत.
माजी मंत्री छगन भुजबळ हे नेहमीच आपली मते रोखठोकपणे व्यक्त करतात. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ते काय बोलतात, काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, हे बघावे लागणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.