MPSC Paper Leak  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटीशी पुणे महापौर कार्यालय अन्‌ सोलापुरातील आमदारपुत्राचं काय कनेक्शन? : काँग्रेस नेत्याचा सवाल

Congress Leader Shivraj More Questions : एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात नव्या आरोपांनी वाद वाढला असून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पुणे आणि सोलापूर कनेक्शनचा सवाल उपस्थित केला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 July : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटीबाबतची संदिग्धता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी तर या पेपरफुटीशी पुणे महापौर कार्यालय आणि सोलापुरातील एका आमदार पुत्राचा काय कनेक्शन आहे, असा सवाल केला आहे.

नीट पेपर फुटीवरून देशभरात आगडोंब उसळला होता. त्या प्रकरणात केंद्रातील मोदी सरकारला प्रथमच बॅकफूटवर जावं लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढला. जंतर मंतरवर उपोषण केले, त्याला संपूर्ण देशातून समर्थन मिळाले.

देशभरातून दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांनी न डगमगता आंदोलन सुरूच ठेवले, त्यामुळे अखेर केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्यात लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून रणकंदन माजले आहे. त्यात सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांनीच हा आरोप केला आहे. त्याला आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून बळ दिले जात आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. त्यात मोरे यांनी म्हटले आहे की, MPSC (औषध निरीक्षक भरती प्रक्रिया) पेपर फुटीत पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय??....सोलापूर जिल्ह्यातील आमदार पुत्राचं पेपर फुटीत कनेक्शन काय?? असे सवाल केले आहेत.

चक्रव्यहात अडकला आणखीन एक अभिमन्यू ?? असे सांगून शिवराज मोरे यांनी ‘यावर खुलासा लवकरच....’ असा इशारा देताना मुख्यमंत्र्यांनी पेपर फुटीवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT