Kumbh Mela : ‘मी नाशिकला कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री म्हणून नव्हे; तर कार्यकर्ता म्हणून जाईन’

Jaykumar Gore Statement : नाशिक कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. आषाढी वारीतील अनुभव कुंभमेळ्याच्या नियोजनात उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 July : नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री म्हणून नव्हे; तर एक कार्यकर्ता म्हणून काम करू. वारीत केलेल्या कामाचा अनुभव त्या ठिकाणी कामी येईल. आमचे मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी चांगले काम करत आहेत. मी कार्यकर्ता म्हणून तिथे काम करेन, असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ई-२० पेट्रोलच्या धोरणावरून होत असलेल्या टीकेवरही पालकमंत्री गोरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते चांगले केले आहेत. मात्र, चांगल्या कामाला बदनाम करण्याची रीत आपल्याकडे आहे. पण, त्यांच्यासारखे काम कोणीही केलेले नाही.

भरत गोगवले यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या विधानाबाबत जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश हे त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.

Jaykumar Gore
Electricity Supply : उजनी धरण अन्‌ नदीकाठी आता 8 तास वीजपुरवठा : जयकुमार गोरेंची घोषणा

आपण राज्यातील जबाबदार मंत्री आहोत, त्यामुळे अशा चर्चा होतील ,असे विधान करू नये. माझी विनंती आहे की, मंत्र्यांनी आशा गोष्टीवर भाष्य करू नये. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार आहेत, असा दावाही गोरे यांनी केला.

Jaykumar Gore
Satara Politic's : शिवेंद्रराजेंनी निवडणुकीआधीच गेम फिरवला; सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महत्वाची घडामोड...

धाराशिवमधील शिवसेना-भाजप वादावर भाष्य

धाराशिवमधील शिवसेना-भाजप वादावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आपला जीव धाराशिव हे व्हिजन घेऊन झेडपीने संकल्प केला आहे. ग्रामीण भागात ग्रंथालय यासह विविध सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कामाच्या उणीवा शोधाव्यात, राजकीय उणीवा शोधू नका. कार्यक्रमाला शिवसेना आणि इतर पक्षाचे नेतेही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com