MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav BJP News : सरकार बदलले की काहींना पाणीप्रश्न आठवतो...जयकुमार गोरे

Jaykumar Gore सिद्धेश्वर कुरोली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीत जयकुमार गोरे बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-निहाल मणेर

Aundh News : औंधसह १६ गावांच्या पाणीप्रश्नात नेहमीच राजकारण आणले जाते, या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीशिवाय हा प्रश्न सोडवायचा असा काहींचा अट्टाहास असल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. विशिष्ट पक्षाचे सरकार होते, तेव्हा हा प्रश्न उभा राहिला नव्हता. सरकार बदलले की काहींना लगेच पाणीप्रश्न आठवतो. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून या पाणीप्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीत आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore बोलत होते. यावेळी वर्धनचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, भरत जाधव,धनंजय चव्हाण,सोमनाथ भोसले, विशाल बागल, शहाजी देशमूख,आण्णासाहेब हिरवे यांचेसह गावोगावचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, आजपर्यंत जनतेच्या हिताची भूमिका कोणत्याही नेत्याने घेतली नाही. मतदारसंघात इंच ना इंच जमीन भिजवण्यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न आहे. उरमोडी लाभक्षेत्राबाहेरील गावांना जिहे कठापुरचे पाणी कसे देता येईल, यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे.

औंधसह १६ गावांचा प्रश्न मीच सोडविणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुरुवारी या योजनेची सर्व माहिती मांडणार आहे, कारण माझ्या मतदारसंघातील गावांना पाणी देणे माझे कर्तव्य आहे, कोणाच्या इगोसाठी मी माझे काम थांबविणार नाही व औंधसह सोळा गावांच्या फाईलवर उपमुख्यमंत्री यांची सही झालेली आहे, असे सांगणारे जनतेची दिशाभूल करीत आहेत.

तत्कालीन उपमुख्यमंत्री औंधला अनेकवेळा आले, बैठका झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर का आंदोलने केली नाहीत, उपोषणे झाली नाहीत,त्यांना का निवेदने दिली नाहीत, सरकार बदलल्यावरच का आंदोलन उभे राहते याचाही विचार सुज्ञ जनेतेने करावा,केवळ आमदारांना श्रेय मिळेल या भावनेतून या प्रश्नाला मूळ मुद्यापासून बाजूला केले जात आहे.राजकारण बाजूला ठेवून या मातीचा विचार करा असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT