NCP Office Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त, काय आहे कारण ?

Police in Front Of NCP Mumbai Office : शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा
Police, NCP
Police, NCP Sarkarnama
Published on
Updated on

NCP Gaddar Din : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेनेत गेल्या वर्षी बंड करण्यात आले. त्यामुळे राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्या बंडाला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना (शिंदे गट) खोके दिन, तर राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दिन साजरा करणार आहे. याला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर तालुका पातळीवर गद्दार दिन साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याची तयारी म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणांचे फलक तयार केले आहेत. त्या माध्यमातून थेट शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात राज्य राखीव सुरक्षा बलाचाही समावेश आहे.

Police, NCP
Thackeray-Shinde Politics: माजी आमदार संजय कदमांसह ठाकरे गटाच्या २५ जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शिवसेनेत बंड करणाऱ्या आमदारांना ठाकरे गटाकडून 'खोके गँग', 'गद्दार' म्हणून हिणवले जात आहे. हाच संदर्भ घेत आज महाविकास आघाडीतील ठाकरे गट 'खोके दिन' तर राष्ट्रवादी काँग्रेस 'गद्दार दिन' साजरा करणार आहे. तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे स्वाभिमानातून बंड केल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गट आज राज्यभरात 'स्वाभिमान दिन' साजरा करणार आहे. या दिनांच्या निमित्ताने राज्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार आहे.

Police, NCP
India China Dispute : लडाख सीमेवरील भारताची २६ गस्त ठिकाणे चीन घेतली ताब्यात? काँग्रेसचा गंभीर आरोप!

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उद्या गद्दार दिवस आहे. तो साजरा केला पाहिजे, असे आवाहन केले होते. दरम्यान, मुंबईतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. गद्दार दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत. यामुळे ठाकरे-शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com