Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News: अधिवेशन काळात ते कुठं असतात... शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले

Umesh Bambare-Patil

Satara News : लोकसभेच्या अधिवेशनाला खासदार गेलेले नाहीत. याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खरं तर हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा. पण ते अधिवेशनाच्या काळात कुठं असतात. नियोजन समितीतून कामे मंजूर झाली की त्याचा नारळ उदयनराजेंनी फोडायचा. मुळात हे काम मंजूर करताना त्या सभेला उदयनराजे हजर नसतात. मंजूर झालं की मी खासदार आणि मीच सगळं केलं आहे, असे लोकांना दाखवतात. आता सातारकर यांना भुलणार नाहीत, अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना डिवचले.

अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. यातून सातारा पालिकेला विविध योजनांसाठी माझ्या मागणीप्रमाणे मोठ्याप्रमाणात निधी मिळालेला आहे. नवीन हद्दवाढीतील भाग आणि जून्या भागातील विविध विकास कामांसाठी सहा कोटी ७० लाखांचा निधी मिळाला आहे. जलद गतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

आणखी निधीची मागणी केलेली आहे. सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरणासाठी निधी मिळवा, यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. आमदार म्हणून कामे मंजूर करुन त्यांना निधी मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु असतो. त्यातून कामे होतात. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कामे होणे, निधी मिळणे व ती दर्जेदार होणे यालाच माझे प्राधान्य आहे.

पण, आजपर्यंत केंद्रातून सातार शहरासाठी काहीच आलेले नाही, असा चिमटा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना काढला. इतर योजना सातारकरांसाठी किती उपयोगाच्या झाल्या, असा प्रश्न करुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कासचे काम अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मान्यता मिळवली. सुप्रमाही मीच मिळवली. शहरातील ग्रेड सेपरेटरचा काहीही उपयोग नाही. या कामांतून लोकांची अडचणच होत आहे.

लोकसभेच्या अधिवेशनाला खासदार गेलेले नाहीत. याविषयी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खरं तर हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा. पण, ते अधिवेशनाच्या काळात असतात कुठं. नियोजन समितीतून कामे मंजूर झाली की त्याचा नारळ उदयनराजेंनी फोडायचा. मुळात हे काम मंजूर करताना उदयनराजे सभेला हजर नसतात. मंजूर झालं की मी खासदार आणि मीच सगळं केलं आहे, असे लोकांना दाखवतात. आता सातारकर यांना भुलणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT