Udayanraje Bhosale News : माझ्यावर लाेकांचे प्रेम आहे, म्हणून माझे पेंटिंग काढतात. त्यांनीही लोकांच्या मनात प्रेम निर्माण होईल असे काम करावे. म्हणजे लोक त्यांचेही पेंटिंग काढतील, असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना Shivendraraje Bhosale दिला आहे. दरम्यान, त्या महान व्यक्तींच्या सल्ल्यानुसार आम्ही अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढण्याबाबतही विचार करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदयनराजचे चित्र काढण्यावरुन पालकमंत्री शंभूराज देसाई व उदयनराजे समर्थक यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर टीका केली होती. त्याला खासदार उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. उदयनराजे म्हणाले, पेंटिंगचा वादाचा विषय असू शकत नाही. मला वृत्तपत्रातून समजले की मोठा वाद झालाय. पण, तेथे कोणताही वाद नव्हता.
शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत. लोक त्यांना भेटण्यास गेले होते. त्यांनी विचारणा केली त्यातून गैरसमज झाला होता. पण आता वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर भरपूर प्रेम असणारी एक महान व्यक्ती आहे, त्यांनी इथं कशाला पेंटिंग काढताय अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही विचार करु. पण, माझा स्तुती प्रिय स्वभाव नाही.
लोकांचे प्रेम आहे, म्हणून ते पेंटींग काढतात. त्यांनीही लोकांची सेवा करावी. लोकांच्या मनात प्रेम निर्माण होईल कसे काम करावे म्हणजे त्यांचेही लोक पेंटिंग काढतील. कामे कोणी केली, काय केली हे सांगायची गरज नाही. इतक्या वर्ष आमदारकी पालकमंत्रीपद, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना ३०-३५ वर्षे काहीही झालं नाही.
पण गेल्या दहा वर्षात माझ्या हातून विविध विकास कामे झाली. पण मी श्रेय वादात पडणार नाही. मी त्यांना श्रेय द्यायला तयार आहे. पण, त्या अगोदर विकास कामे का झाली नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. तसेच लोकांना विकास कामांपासून वंचित राहावे लागले होते. मी लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असतो. त्यामुळे लोकांनी ठरवावे, काय बरोबर आणि काय चुकीचे. पण, तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य कोणीही करु नये. हा नियम मलाही लागू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.