Satish Wagh Murder Case : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या पत्नी मोहिनी यांच्यासह आरोपी अक्षय जवळकर यांना अटक करण्यात आली असून त्यांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या चौकशीत काही अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वाघ (Satish Wagh) यांचं अपहरण केल्यानंतर चालत्या कारमध्ये त्यांच्या त्यांच्या गळ्यावर तब्बल 72 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. शिवाय वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच संपत्तीच्या आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्येचा कट रचल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.
तर सतीश वाघ यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता. तर ज्या धारदार शस्त्राने सतीश वाघ यांचा खून करण्यात आला होता. ते शस्त्र भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना (Police) दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप पोलिसांना सापडलेलं नसल्याची माहिती आहे.
सतीश वाघ हत्येप्रकरणी पत्नी मोहिनी वाघसह 6 आरोपींची येरवडा (Yerwada) कारागृहात रवानगी केली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पवन श्यामसुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, विकास सीताराम शिंदे, अक्षय हरिश जावळकर, मोहिनी सतीश वाघ आणि अतिश संतोष जाधव अशी न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, वाघ हत्येप्रकरणी न्यायालयात सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्या म्हणाल्या, जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात फेकल्याचं सांगितलं. मात्र, नदीपात्रामध्ये शोध घेतला तरीही ते शस्त्र अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करायचा असल्याचा युक्तिवाद वाघमारे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींची येरवडा कारागृहात नेण्याची परवानगी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.