
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण तापले असून राज्यात सर्वत्र याची धग पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात असतानाच बीड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढून फरार आरोपीना तात्काळ अटक करण्याची मोठी मागणी केली आहे. त्यातच आता सरपंचावरील हल्ल्यामुळे सरपंच परिषद आक्रमक झाली असून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंचांनी मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरण व तुळजापूर तालुक्यातील सरपंचावर झालेला हल्ला त्यासोबतच राज्यात सतत सरपंचावर होणाऱ्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी सात जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच मुंबईत धरणे आंदोलन करणार आहेत, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेने घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा तुळजापूर तालुक्यतील सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या दोन घटनामुळे राज्यातील सरपंचावरील हल्ले रोखण्यासाठी सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी व राज्यात येत्या काळात अशा चिंताजनक घटना घडू नये, यासाठी सरपंच परिषद आंदोलन करणार आहे.
येत्या काळात सरपंचाच्या सुरक्षेची हमी घेण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जीएम पाटील यांनी मागणी केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणारे याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.