Ranjitsinh Mohite-Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil : मोहिते पाटलांनी कुठल्या संस्था बुडविल्या? : रणजितसिंह मोहिते पाटलांचा जाहीर सवाल

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँकेच्या मागील 15 वर्षांच्या कारभारावरील आरोपांना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. अध्यक्षपदाच्या काळात खासगी संस्थांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 23 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मागील १५ वर्षांतील कारभाराबाबत बोलताना मोहिते पाटलांनी संस्था बुडवल्या, असं सांगितलं जातं. पण कुठली संस्था बुडविली? माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आमच्या संचालक मंडळाकडून एक रुपयाचंही कर्ज माझ्या कोणत्याही खासगी संस्थेला दिलेले नाही. निवडणुकीत चर्चा वेगळीकडे नेली जाते, असा आरोप माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधी गटाकडून लढवली जात आहे. त्याची प्रचारसभा रविवारी रात्री उशिरा सोलापुरात झाली. त्या सभेत बोलताना विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपला मोहिते पाटील यांनी उत्तर दिले.

माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आमच्या संचालक मंडळाकडून एक रुपयाचंही कर्ज माझ्या कोणत्याही खासगी संस्थेला दिलेले नाही. मी जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष होतो, त्यावेळी खासगी कारखाने नव्हतेच. माझे सोडा, दुसऱ्याचेही नव्हते. त्यामुळे कर्जवाटपाचा प्रश्न येतोच कुठून? त्यामुळे निवडणुकीत चर्चा वेगळ्या दिशेला नेली जाते. ही निवडणूक कोणाची प्रतिष्ठा कमी करायची आणि कुणाची वाढवायची, यासाठी नाही. कोणाला तरी कमीपणा दाखवायचा, यासाठीही नाही, असेही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, एकाच तालुक्याला, भागाला ११-११ कोटी रुपयांचं कर्जवाटप होतं. मग जिल्ह्यातील इतर तालुक्यांत दुष्काळ नाही का? शेतकरी नाहीत? की इतर संस्था नाहीत? हे जे झाले आहे, ते कशासाठी असा सवाल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला.

बॅंक चालवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. निवडणुका आल्या, राजकारण लागलं म्हणून कोणाला तरी एकाच तालुक्याला पैसे द्यायचे, एकाच तालुक्यात वाटप करायचं, हे सर्व कसं चालेल?, असेही मोहिते पाटील यांनी विचारले.

ते म्हणाले, आमच्या अख्ख्या प्रचारात आम्ही कोणाचंही नाव घेतलेले नाही आणि कुणावरही टिकाटिपण्णी केलेली नाही. आम्ही फक्त बॅंकिंगवर बोलतोय. कारण निवडणूक बॅंकेची आहे. आमच्या पॅनेलमधील सगळी जबाबदारी मंडळी आहेत. त्यामुळे जबाबदार माणसं त्या सभागृहात गेली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. तसेच माझ्या शेतकऱ्याची मुलं परदेशात शिक्षणासाठी जातात, त्यांनाही सहजरित्या आणि कमी व्याजदारानं कर्ज मिळालं पाहिजे. सरकारी योजनांना जिल्हा बॅंकेतून कर्ज मिळालं पाहिजे. घराचं बांधकाम करताना जिल्हा बॅंकेने कर्ज दिलं पाहिजे, हे आम्ही आमच्या प्रचारातून मांडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT