Umesh Patil Vs Rajan Patil : उमेश पाटलांचा राजन पाटलांवर पुन्हा हल्लाबोल : ‘आता खानदानी ओबीसी म्हणून घ्यायला सुरुवात करा...’

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँकेच्या ओबीसी जागेवर अजिंक्यराणा पाटील यांच्या बिनविरोध निवडीवरून उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केली. त्यांचे राजकारण मोहोळऐवजी कुटुंबाभोवती केंद्रित असल्याचा आरोप केला.
umesh patil-Rajan Patil-Balraje patil-Ajinkyarana patil
umesh patil-Rajan Patil-Balraje patil-Ajinkyarana patilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 23 November : विक्रांत पाटील आणि अजिंंक्यराणा पाटील यांच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बिनविरोध निवडीवरून विशेषतः अजिंक्यराणा यांची ओबीसीच्या जागेवर झालेल्या निवडीबद्दल उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजन पाटील यांचे राजकारण हे मोहोळ तालुक्याच्या हितासाठी नसून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आहे. हे पूर्वी स्वतःला जाहीरपणे खानदानी पाटील म्हणून घेत होते. आता त्यांनी खानदानी ओबीसी म्हणायला सुरुवात करावी, अशी टीका उमेश पाटील यांनी केली.

त्यांनी लोकनेते हा सहकारी साखर कारखाना खासगी करून तो स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने करून घेतला आहे. तो पूर्वी शेतकऱ्यांचा कारखाना होता, त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार, असा सवालही पाटील यांनी केला.

उमेश पाटील म्हणाले, राजन पाटील हे अनेकदा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्याच काळात ही बॅंक दिवाळखोरीत निघाली. माजी संचालकांकडे ११५० ते १२०० कोटी रुपयांची वसुली आहे. सहकार कायद्यातील तरतुदी आणि चौकशीमुळे या माजी संचालकांना निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठविण्याचा दुसरा मार्ग शोधला. म्हणजे दुसऱ्या पिढीला पाठवून राहिलेली बॅंक लुटून खाण्याची व्यवस्था या लोकांनी केली आहे.

एकाच्याने झेपणार नाही म्हणून त्यांना दोघं दोघं पाहिजेत. जिल्हा बॅंकेच्या ओबीसीच्या जागेवर उमेदवार मिळाला नाही. त्या कुवतीचा उमेदवार मिळाला नाही, असे काही नेत्यांनी सांगितले. म्हणजे हाच (अजिंक्यराणा पाटील) एकटा खानदानी पाटील ओबीसीच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या लायकीचा होता का? ते स्वतःला जाहीरपणे खानदानी पाटील म्हणून घेत हेाते ना. आता खानदानी ओबीसी म्हणायला तरी सुरुवात करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

umesh patil-Rajan Patil-Balraje patil-Ajinkyarana patil
Prashant Paricharak : पंढरपुरातील कट्टर विरोधकाच्या नगरसेवकांकडून मंगळवेढ्यात प्रशांत परिचारकांचा सत्कार; अध्यक्षपदासाठीही दिल्या शुभेच्छा...

ते म्हणाले, संधी मिळेल त्या ठिकाणी स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार, यापलिकडे विचार केला जात नाही. तालुक्यातील सगळे ओबीसीचे नेते-कार्यकर्ते काय मेले होते का? सहकार क्षेत्रातील एखाद्या जानकार व्यक्तीला बॅंकेवर पाठवायचे ना. पण तसं कसं होईल. आलीय संधी तर घेऊ हात धुवून. उरलेली बॅंकही लुटून खाण्याचा यांचा प्लॅन आहे.

निवडणूक न घेण्याची आमची मागणी होती...

बॅंकेची निवडणूक न लावता प्रशासक कायम ठेवा, अशी आमची मागणी होती. कारण दिवाळखोरीत गेलेली बॅंक प्रशासकाच्या काळात कशीतरी जागेवर आली होती. त्या प्रशासकांनी या माजी संचालकांच्या प्रॉपर्ट्या सील करून त्यांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेपर्यंत येऊन हे थांबलं आहे. त्यामुळेच या माजी संचालकांना निवडणूक लावण्याची घाई होती. काहीही करून आपली पोरं तर त्या ठिकाणी गेली पाहिजेत, असं त्यांना वाटत होतं, असा दावाही पाटील यांनी केला.

प्रशासकाच्या काळात माजी संचालकांच्या प्रॉपर्ट्या विकून साडेअकरा ते १२०० कोटी वसूल केले जाणार होते. मात्र, आता हे संचालक मंडळ ते करणार आहे का. प्रॉपर्ट्या कुणाच्या आहेत, तर यांच्या बापाच्या म्हणजे यांच्याच. आता हे काय स्वतःच्या प्रॉपर्ट्या जप्त होऊ देतील काय, असा सवाल उमेश पाटील यांनी केला.

umesh patil-Rajan Patil-Balraje patil-Ajinkyarana patil
Solapur Dcc Bank Voting : डीसीसी बॅंकेच्या मतदानात डाव्या अंगठ्यापासून करंगळीपर्यंत शाई लावणार; एकापेक्षा अधिक मतदानासाठी निर्णय

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विचारात घेतलं नव्हतं का, असं म्हणण्याऐवजी सहकारात पक्षीय राजकारण नसतं, हे आपण स्वीकारलं पाहिजे. आमच्या कोणत्याही संस्था नाहीत. तसेच, जिल्हा बॅंकेवर प्रशासकच असावा, अशी आमची भूमिका होती. त्यामुळे आम्हाला त्यांनी विचारलं नाहीच. पण विचारलं असतं तरी निवडणूक घेऊ नका, अशीच आमची भूमिका राहिली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.