Islampur Congress Bhavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Vs NCP : इस्लामपुरातील कार्यालय नक्की कोणाचे ? दोन्ही काँग्रेसमधील वाद चिघळणार...

सरकारनामा ब्यूरो

Islampur News : पक्षफुटीनंतर कार्यालय कुणाचे हा वाद शिवसेना नेत्यांमध्ये झाल्याचे आपण पाहिले, पण आता काँग्रेसचे पक्ष कार्यालय राष्ट्रवादीने हडप केल्याचा आरोप इस्लामपूर काँग्रेसने केला आहे. कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असणारा वाद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या कोर्टात पोहचला आहे.

काही महिन्यांपूर्वी इस्लामपुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ही काँग्रेसची असल्याबाबतची चर्चा झाली. या कार्यालयाबाबत आता शरद पवार व नाना पटोले काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.

शहरातील तहसीलदार कचेरी शेजारील मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालय आमचेच आहे. ते आमच्या ताब्यात मिळावे, यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवारांकडे दिल्ली येथे भेटून आपली भूमिका मांडली.

कॉग्रेसचे वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक प्रदेश काँग्रेस सचिव विजय पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (अल्पसंख्याक) शाकीर तांबोळी यांनी भेट घेत या प्रश्नावर पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करू, इस्लामपूरच्या कार्यालयाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पवारांनी दिल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, "आमच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पक्ष कार्यालय आमच्याच मालकीचे आहे. तर १९९९ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस कमिटीचे कार्यालय राष्ट्रवादीचे पदाधिकारी वापरत आहेत,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT