Kolhapur Guardian Minister Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Guardian Minister: कोल्हापुरचा 'वस्ताद' कोण? मुश्रीफ की आबिटकर; रस्सीखेच सुरु...की तिसराच बाजी मारणार?

Kolhapur Guardian minister Hasan Mushrif Prakash Abitkar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी हसन मुश्रीफ इच्छुक होते. मात्र गृहराज्यमंत्री असणाऱ्या सतेज पाटील यांनी पालकमंत्री पदावर आपले नाव कोरले.

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नव्या वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना अपेक्षा होती. पालकमंत्रिपदाचा घोळ संपता संपत नाही. अशी परिस्थिती असताना 26 जानेवारी रोजी पर्यंत पालकमंत्री पदाचे नाव कळेल, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता.

पालकमंत्री पदासाठी कोणतीच ईर्षा नाही, असे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी हे पद खेचण्यासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना या पदासाठी घाईच लागल्याचे नजीकच्या वक्तव्यावरून दिसून आले.

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर जिल्ह्याचे तिघे सुपुत्र इच्छुक आहेत. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तर पुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी हसन मुश्रीफ इच्छुक होते. मात्र गृहराज्यमंत्री असणाऱ्या सतेज पाटील यांनी पालकमंत्री पदावर आपले नाव कोरले. कॅबिनेटमंत्री असून देखील मुश्रीफ यांना या पदाने हुलकावणी दिली.

महायुती सरकारच्या काळात मुश्रीफ यांची ही इच्छा पूर्ण झाली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. शिवसेनेचे चार, भाजपचे तीन, जनसुराज्याचे दोन, आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असे संख्याबळ झाले.

महायुतीच्या सूत्रानुसार जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याच्याकडे पालकमंत्रीपद हे निश्चित समजले जाते. मात्र भाजपच्या सूत्रानुसार ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्र्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपकडून पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे.

आगामी राजकीय काळात महायुतीतील सर्वच पक्षांना जिल्ह्यातील पक्षाची ताकद मजबूत करायची आहे. अशातच पालकमंत्री पदावर आपल्याच पक्षाचा मंत्री हवा अशी सर्व पक्षीयांची इच्छा आहे. त्यामुळे भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचे नाव समोर केले जात आहे.

राष्ट्रवादीकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर हे देखील आग्रही आहेत. जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती पाहता आगामी सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षाचे राजकीय प्रस्ताव वाढवण्यासाठी हे पद महत्त्वाचे आहे.

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी 'पालकमंत्री... पालकमंत्री...' अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना पालकमंत्री म्हणून आपण स्वागत करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मात्र ही चूक दुरुस्त केली. पण पालकमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना लागलेली घाई यावरून चांगलीच स्पर्धा लागली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT