Sharad Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? नव्या चेहऱ्यांना संधी...; मुंबईत मोठी घडामोड होणार

Sharad Pawar NCP Party Maharashtra Politics 2025:सर्वच सेलच्या पदावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या बैठकीत शरद पवार पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेणार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अँक्शन मोडवर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाअंतर्गत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याबाबतची वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज आणि उद्या मुंबईमध्ये महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. महिला प्रदेश अध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे प्रमुख बदलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar
Sanjay Shirsat: शिळ्या कढीला ऊत! संजय शिरसाट यांच्या पोटातले पुन्हा आले ओठांवर!

सर्वच सेलच्या पदावर नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या बैठकीत शरद पवार पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेणार आहेत. त्यानंतर हा बदल करण्यात येणार असल्याचे साम टीव्हीच्या बातमीत म्हटलं आहे. या बैठकीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
PCMC News: तिसरं अपत्य जन्माला घातलं अन् सरकारी नोकरी गेली! पिंपरी महापालिकेचा बडा अधिकारी बडतर्फे

नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थित ही बैठक होत आहे. मंत्री, आमदार, खासदारांसह सर्व विभाग प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर पक्षात योग्य ते बदल करण्यात येणार असल्याच सांगितलं जात आहे.

Sharad Pawar
Congress New Headquarters : भाजपनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचाही पत्ता बदलणार; काय आहे 'इंदिरा गांधी' भवन; VIDEO पाहा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) केवळ 10 जागा जिंकता आल्या. प्रचारात पवारांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला, पण पक्षाला अपेक्षीत यश मिळाले नाही. आता लोकल बॅाडी इलेक्शनसाठी पक्षानं कंबर कसली असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com