बच्चू कडूंचा आरोप – माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “सर्वांत मोठे आका” असल्याचा गंभीर आरोप केला.
भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर – गोगावले यांनी कडूंच्या विधानाला गांभीर्य न देता ते सत्तेत असताना हे का बोलले नाहीत, असा सवाल करत हे लोकांना आकर्षित करण्यासाठीचे वक्तव्य असल्याचे सांगितले.
आरक्षण आणि जाहिरात विषय – गोगावले यांनी ओबीसी, मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर इतरांना नुकसान न होईल अशी भूमिका मांडली आणि फडणवीसांच्या जाहिरातीबाबत “हरकत नाही” असे स्पष्ट केले.
Solapur, 14 September : माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वांत मोठे आका आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्याला उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी बच्चू कडू हे मंत्रिमंडळात होते, तेव्हा त्यांना हे सूचलं नव्हतं का. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षिक करून घेण्यासाठी अशी विधान करतात, असे स्पष्ट केले आहे.
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्यावर सर्वांत मोठा आरोप केला होता. मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री आका आहेत, सर्वांत मोठे आका हे फडणवीस आहेत, असं म्हटलं होते. त्याला मंत्री गोगावले यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे स्वतः मंत्रिमंडळात होते, त्यावेळी त्यांना काही सुचलं नाही. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी, लोकांना आपलसं करण्यासाठी आणि तुम्हाला काहींना काही तरी सांगण्यासाठी असे वक्तव्य ते करत असतात. त्यांच्या सगळ्याच वक्तव्यांना गांभीर्याने घ्यावे, असं मला वाटत नाही.
आमशा पाडवी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर गोगावले म्हणाले, प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाला काळजी आहे की, समाजातील कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ नये. यामध्ये ओबीसी समाजचे नुकसान न होता मराठ्यांना द्यावं, आदिवासींचं नुकसान न होता धनगरांना द्यावं, त्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. कुठल्याही समाजाची अडचण करून दुसऱ्या समाजाला आम्हाला द्यायचं नाही, ही आमची भूमिका आहे.
जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतोय यापेक्षा पूर्वी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलेले होते, ते अजूनही चालू आहे. आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार हैदराबाद, सातारा आणि औंध गॅझेट यात जे काही असेल ते दिले जाईल. आम्ही वेगळं कांही सांगतोय किंवा मागतोय अशातला भाग नाही. आमची एकच मागणी आहे की, इतर कोणावरही अन्याय न होता, हे मिळावं हे प्रत्येकाची मागणी आहे.
फडणवीसांच्या 'त्या' जाहिरातीबाबत गोगावले काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस जाहिरातीबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले म्हणाले, ती जाहिरात पहिल्यानंतरच आम्हाला कळलं. ती कोणी दिली, याचा उलगडा अजून कोणालाही झालेला नाही. मात्र काही हरकत नाही. शिवाजी महाराजांना जर पुष्पांजली वाहत असतील तर चांगली बाब आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
प्र.1: बच्चू कडू यांनी कोणावर “सर्वांत मोठे आका” असल्याचा आरोप केला?
उ. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर.
प्र.2: भरत गोगावले यांनी या आरोपाला काय उत्तर दिले?
उ. – कडू हे सत्तेत असतानाच बोलायला हवे होते, आता लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हे वक्तव्य करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
प्र.3 : फडणवीसांच्या जाहिरातीबद्दल गोगावले काय म्हणाले?
उ. – जाहिरात कोणी दिली याचा उलगडा नाही, पण शिवाजी महाराजांना पुष्पांजली वाहणे ही चांगली बाब आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.