<div class="paragraphs"><p>Dattatraya Varade</p></div>

Dattatraya Varade

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकावर आत्महत्येची वेळ का आली?

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावलेल्या अनेक पिढी महाराष्ट्रात आहेत. या पिढीतीलच एक शिवसेनेचे ( Shivsena ) कार्यकर्ता असलेले दत्तात्रय वराडे. दिवसभर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करायचा आणि आवड म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेचे काम करणारा ते सच्चे शिवसैनिक. त्यांनी नुकतीच आत्महत्या केली. ही आत्महत्या प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाच्या मनाला चटका लाऊन जाणारी ठरली. Why did Balasaheb Thackeray's true Shiv Sainik commit suicide?

त्यांनी दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही की कधी कुटुंबाची पर्वा केली नाही. `जात, धर्म आणि गोत्र आमची शिवसेना`, असे म्हणत थोडीथोडकी नाही तर 40 वर्षे शिवसेनचा भगवा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका सामान्य शिवसैनिकाचा शेवट वाईट व्हावा, या सारखी दुसरी शोकांतिका असू शकत नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन जिल्ह्यात पहिली शिवसेनेची शाखा स्थापन करणाऱ्या कट्टर, निष्ठावान शिवसैनिक असलेल्या दत्तात्रय वराडे याने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली.

शिवसेनेला सर्वस्व मानणाऱ्या, पक्ष आणि नेत्यांसाठी प्रसंगी घरावर तुळशी पत्र ठेवून स्वतःला झोकून देणाऱ्या शिवसैनिकाच्या नशीबी अशी वेळ का यावी? आयुष्यभर संघर्ष आणि वाघा प्रमाणे निधड्या छातीने येणाऱ्या संकटांवर स्वार होणारा हा शिवसैनिक वयाच्या उतार वयात म्हणजेच 65 व्या वर्षी का खचला असेल? याचा विचार करणे देखील गरजेचे आहे.

राजकारण म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असे नेहमीच बोलले जाते. बऱ्याच अंशी ते खरे देखील आहे, पण पक्ष, नेते आणि संघटनेसाठी झटणारा, सतरंज्या उचलणारा, खांद्यावर झेंडा घेऊन बेंबीच्या देठापासून आरोळी ठोकणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कायम उपेक्षितच राहतो. दत्तात्रय वराडे हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल.

आर्थिक संकटात सापडलेल्या वराडे यांनी मृत्यूला जवळ केले खरे, पण त्यांच्या दुर्दैवी जाण्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहे. चहाची टपरी चालवून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या वराडे यांना आत्महत्या करावी लागली. आता त्यांचे कुटुंबापुढे दुःखाचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे.

पक्षासाठी पंधरा पंधरा दिवस चहाची टपरी बंद ठेवून प्रचार, सभांमध्ये शिवसेना जिंदाबादची घोषणा देणारे वराडे कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊनमुळे अडचणीत होते. व्यवसाय बंद पडला, कुटुंबाचा सांभाळ करतांना ओढाताण होत असल्याने त्यांनी यापुर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नशिब बलवत्तर म्हणून ते वाचले. पण दुसऱ्यांदा मात्र त्यांनी नशिबाला हुलकावणी देत मृत्यूला कवटाळलेच. त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे.

शिवसेना हे कुटुंब आहे आणि प्रत्येक शिवसैनिक त्या कुटुंबाचा सदस्य असे नेते नेहमीच सांगतात. आता वराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, तो आधार शिवसेनेच्या कुटुंबाकडून निश्चितच मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT