शिवसेना म्हणते, कंत्राटदाराचे २८ कोटी रुपये देऊ नका?

भुयारी गटार योजनेंतर्गत देवपूरमध्ये चेंबरची पाहणी करताना शिवसेना पदाधिकारी.
Shivsena office bearers checking Road Chambers

Shivsena office bearers checking Road Chambers

Sarkarnama

Published on
Updated on

धुळे : भुयारी गटार योजनेची देवपूरमध्ये (Dhule) वाट लागली आहे. ठिकठिकाणी निकृष्ट काम आणि रस्त्यांचे तीन तेरा वाजविल्यानंतर चेंबरच्या कामापोटी २८ कोटींचे बिल मिळेपर्यंत गुजरातच्या ठेकेदार पटेल कंपनीने दिवाळीपासून काम बंद केले आहे. त्याविषयी देवपूरवासीयांमध्ये ठेकेदारासह सरकारी यंत्रणांवर रोष आहे. हे बील अदा करू नये अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

<div class="paragraphs"><p>Shivsena office bearers checking Road Chambers </p></div>
भाजपला भिडण्यासाठी शिवसेनेचे यंदा खानदेशी कार्ड?

यासंदर्भात काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवपूरमध्ये आंदोलन करत हातोड्याचा घाव घालून चेंबरची तपासणी केली. तेव्हा चेंबर फुटले. त्यामुळे आंदोलकांनी काम निकृष्ट असल्याचा दावा केला.

<div class="paragraphs"><p>Shivsena office bearers checking Road Chambers </p></div>
महापौर म्हणतात, कर्मचारी आजारी, नोकरभरतीला परवानगी द्या!

शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निकम यांना निवेदन दिले. ते असे : १३१ कोटी ५४ लाखांच्या भूमिगत गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यात देवपूर भागात दोन ते तीन वर्षांपासून काम सुरू आहे. ते निकृष्ट व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे होत आहे. लहान-मोठे रस्ते ठेकेदाराने खोदून ठेवले. त्यामुळे परिसरातील नागरिक नरक यातना भोगत आहेत. देवपूर भागात २४ नगरसेवक आहेत. पैकी १९ नगरसेवक भाजपचे आहेत. यातील एकानेही आजपर्यंत या विदारक स्थितीबाबत आवाज उठवला नाही. यामुळे नगरसेवक गप्प का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

भूमिगत गटार योजना १४७ किलोमीटरची आहे. आतापर्यंत १२५ किलोमीटर काम झाल्याची माहिती आहे. अद्याप २२ किलोमीटरचे काम शिल्लक आहे. संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत याकामी ९८ कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे. यात १३१.५४ कोटींपैकी ९५ कोटी दिल्यानंतर योजनेत फक्त ३६.५४ कोटी शिल्लक आहेत. ठेकेदाराने पुन्हा प्रॉपर्टी चेंबर व मेन चेंबरच्या कामापोटी २८ कोटी रुपये बिलाची मागणी केली आहे.

या प्रकरणी चौकशी समिती नेमून ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी मागणी शिवसेनेचे आंदोलक सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन आदींनी केली.

--

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com