Shivendraraje Bhonsale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhonsale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : घरच्या कार्यक्रमाला निमंत्रण कशाला लागते... शिवेंद्रसिंहराजेंची खोचक टीका

Umesh Bambare-Patil

सातारा : आपण ज्या घराण्यात जन्मलो आहोत, त्या घराण्यातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर केली.

प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास खासदार उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशीरा निमंत्रण मिळाल्याचे सांगत पालकमंत्र्यांसह इतर कोणाचाही आपल्याला फोन आला नसल्याचे सांगितले होते. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर खोचट टीका केली.

यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देत मला जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण आलं होते. आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे, त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीची असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी खोचक टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

समान नागरी कायद्याबाबत भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले. यामध्ये कश्मीर मधील ३७० कलम हटविण्याची अनेक वर्षाची ही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असे मला सुद्धा वाटतंय. त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.

मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. त्यांनी जे विधान केलंय ते कोणाशी तुलना करून केलेलं नाही.आता अलीकडच्या काळात कुठलेही वक्तव्य केले की भावना भडकण्याचा प्रयत्न होतोय. पण, काल त्यांच्या विधानातून असं काही दिसून येत नाही.

राज्यपालांच्या भूमिकेबाबत तुम्ही आक्रमक दिसत नाही, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "भडक बोलणे म्हणजे आक्रमकता नव्हे" राज्यपाल बदलाच्या निर्णय हे महाराष्ट्रातून होत नाही. तर तो केंद्राकडे आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस हे सर्वांच्या भावना योग्य पोहोचवण्याचे काम करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT