सातारा : काही लोकांच्या हट्टापायी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम हाती घेतले होते. पण, निधी अभावी ते रखडले आहे. या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेचे दूर्लक्ष होत असल्याने हे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करावे. तसेच नियोजन समितीतून तातडीने निधी उपलब्ध करुन देऊन तेथे लवकरच भव्यदिव्य असे स्मारक उभे राहिल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसराचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या शिवतीर्थाचे काम तातडीने व्हावे, अशी मागणी शिवप्रेमींची आहे. हे काम अर्धवट सोडण्यात आले असून काही लोकांच्या अट्टाहासापायी हे काम सुरु करण्यात आले.
ग्रेडसेपरेटच्या कामातील ९० लाख शिल्लक होते, त्यातून हे काम हाती घेतले होते. दुर्दवाने हे पैसे संपल्याने काम अपूर्ण राहिले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सांगून उर्वरित कामासाठी डीपीसीतून दोन कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्हा परिषदने हा शिवतीर्थ परिसर नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावा.
जिल्हा परिषदेकडे तुटपुंजा निधी असून त्याची देखभाल त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे पालिकेकडे निधी उपलब्ध असतो, त्यामुळे तो पालिकेकडे वर्ग करावा. शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्याचे काम पालिका करु शकते. नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.