Raju Shetti
Raju Shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

केंद्रात जाऊन जे गडकरींना साध्य झाले ते शरद पवारांना का नाही?

सरकारनामा ब्युरो

सोलापूर - देशातील साखर उद्योगाला इथेनॉलच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी स्तुती केली आहे. ही स्तुती करतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या केंद्रीय कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ( Why doesn't Sharad Pawar get what Gadkari achieved by going to the Center? )

राजू शेट्टी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले मात्र हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही. हा ही प्रश्नच आहे. गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच मात्र शरद पवार हे कृषीमंत्री होते, साखर कारखानदारांचे मंत्री होते. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याची, टीका राजू शेट्टी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सगळ्यात महत्वाची गोष्ट, शरद पवार हे साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असे साळसूदपणे सल्ला देतात.

अठरा-वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार केला जात नाही. आणि साखरेच्या व्याजावरचा मुद्दा पवारांना भेडसावत असेल तर ते दहा वर्षे कृषीमंत्री होते. 10 वर्षे नाबार्ड त्यांच्या हाताखाली होती. नाबार्ड ही त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होती. नाबार्डकडे निधीची कमतरता नाही. नाबार्डने साखर उद्योगाला साखरेवर उचल किंवा कर्ज दिले असते जे डेरी उद्योगाला देतात तसे. तर साखर उद्योगाला जिल्हा बॅंक किंवा राज्य सहकारी बॅंकेकडून 13 टक्क्यांने कर्ज घ्यावे लागले नसते. ते अवघ्या 2 टक्क्याने मिळाले असते. आणि साखर कारखाने अडचणीत सापडले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांनी कृषीमंत्री असताना नाबार्ड कडून कर्ज दिले नाही कारण जिल्हा बॅंक आणि राज्य बॅंकातील बगलबच्चे पोसायचे होते. साखर उद्योगातून 3 हजार कोटी रुपयांचे व्याज मिळते त्यावर ही बांडगुळे पोसली जातात. शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हित न पाहता बांडगुळांना पोसण्याचे काम केले, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT