शरद पवारांबरोबर मतभेद मात्र, ते जातीयवादी नाहीत... राजू शेट्टी

राजकारणापलीकडे जावुन शेतकऱ्यांचे Farmers प्रश्न Question सोडवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचा Swabhimani Sanghatna हा प्रयत्न आहे, असे राजू शेट्टी Raju Shetty यांनी म्हटले आहे.
Raju Shetty, Sharad Pawar
Raju Shetty, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षापासुन मी ओळखतो. आमचे त्यांचे वैचारीक मतभेत आहेत. मात्र, ते जातीवादी नाहीत, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे केले.

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त श्री. शेट्टी शनिवारी कऱ्हाडला (जि. सातारा) आले होते. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानीचे सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

Raju Shetty, Sharad Pawar
Video: शेतकऱ्याला रात्रीची वीज सकाळी द्या आणि मग वाजवा भोंगे; राजू शेट्टी

श्री. शेट्टी म्हणाले, ''जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रे पासुन बळीराजा उध्दार यात्रा सुरु झाली आहे. एक मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत शेतीला दिवसा १० तास विज मिळावी, शेतकऱ्यांना हमीभावाचा गॅरंटी कायदा केंद्र सरकारने मंजुर करावा हे दोन ठराव करण्यात येणार आहेत.''

Raju Shetty, Sharad Pawar
राजू शेट्टी यांनी दिशा केली स्पष्ट : आता कोणाच्याही वळचणीला जाणार नाही...

''ते ठराव घेवुन उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. राजकारणापलीकडे जावुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचा हा प्रयत्न आहे.'' ते म्हणाले, ''जेष्ठ नेते शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षापासुन मी ओळखतो. त्यांचे राजकारणही बघतो. भले त्यांचे आमचे वैचारीक मतभेत आहेत. ''

Raju Shetty, Sharad Pawar
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणीही गृहीत धरू नये!

''मात्र, एवढ्या दिर्घ काळात त्यांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की ते जातीवादी नाहीत.'' मात्र, शेतकऱ्यांऐवजी ते शेती मालावर प्रक्रीया करणारी जी लॉबी आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवुन धोरण घेतात. त्यामुळे त्यांचे आणि आमचे वैचारीक मतभेद आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com