Ranjit Deshmukh, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही : काँग्रेस नेत्याचा फडणवीसांना सवाल

Ranjit Deshmukh दहिवडी तहसील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी देशमुख, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

Umesh Bambare-Patil

-रूपेश कदम

Maan Political News : पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही? असा प्रश्न करून आता थातूरमातूर गोष्टी करून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केली आहे.

दहिवडी येथील तहसील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी Dhangar Reservation सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणस्थळी काँग्रेसचे नेते Congress रणजितसिंह देशमुख, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

त्यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, हा शब्द दिला होता. मात्र, आता थातूरमातूर गोष्टी करून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. धनगर समाजाने मला भरभरून दिले म्हणणाऱ्यांनी गेल्या आठ वर्षांत धनगर समाजासाठी काय केले.

फक्त तोंडदेखले बोलून चालणार नाही. लोकप्रतिनिधींना आता त्याचा जाब द्यावा लागेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीजातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत जागरूक राहून आरक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यासूपणे विचार करावा लागणार आहे.’’

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT