<div class="paragraphs"><p>Udaynraje-Shivendraraje</p></div>

Udaynraje-Shivendraraje

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंनी 'त्यावेळी' डबे घेवून नेत्यांचे उंबरठे कशाला झिझवले?

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणूकांचा धुरळा नुकताच खाली बसल्यानंतर साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणूकांचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन राजेंमध्ये (Udaynraje vs Shivendraraje) संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. दोन्ही राजे एकमेकांवर टीक करण्याची एक ही संधी सोडताना दिसत नाहीत. कालच खासदार उदयनराजेंनी (Udaynraje) आमदार शिवेंद्रराजेंवर त्यांची बुद्धी लहान असल्याची टीका केली होती. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी (Shivendraraje) आमची बुद्धी लहान असेल पण, खासदारांची बुद्धी अफाट आणि अचाट आहे, असे आमचे मत आहे. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम बघितला तर लोकांमधून निवडून आलेली लोकसभा घालवून राज्यसभेत मागच्या दाराने गेले. हे स्वतः च्या बुद्धीने जाऊन बसलेत, असा उपहासात्मक टोला देखील हाणला.

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, त्यातही जर तुमची एवढी बुद्दी मोठी होती तर जिल्हा बँकेचे संचालक होण्यासाठी मोठे दिवाळीचे डबे घेवून सगळ्यांचे उंबरठे झिजवायची काय गरज होती? रामराजेंकडे (Ramraje Shinde) गेले, बाळासाहेब पाटलांकडे (Balasaheb Patil) गेले, मकरंद पाटलांकडे (Makrandगेले, तिथे शशिकांत शिंदेंच्या हातात एक दिवाळीचा डब्बा दिला. एवढे सगळे डबे पोहोच करायची गरज काय होती? तुमचा जर एवढा सगळा अभ्यास होता तर काय गरज होती या सगळ्याची? बरं झाले ते झाले बिनविरोध, एकदा झाले गायब ते परत जिल्हा बँकेच्या मतदानाला पण साहेब कुठेच नाहीत. कायच नाहीत फिरकलेच नाहीत. आता परत सांगतील जिल्हा बँक कशी चालवायची. मागे एकदा डायलॉग मारला होता, वर बसलेले सगळे चोर आहेत, म्हणून मी खालच्या खाली जातो.

घरफोड्या विरुद्ध नारळफोड्या :

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मध्यंतरी साताऱ्यात नारळ फोडयांची गँग आली असल्याची टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. त्याला काल उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले होते, काम केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. पण दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीची काही लोक असतात, त्यांच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होते. आम्ही कामाचे नारळ फोडतो, केवळ त्यांच्या घराण्याकडे पाहून लोकांनी पैसे गुंतवले होते. आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नामोल्लेख टाळून केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT