सातारा : कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) हे शिवसेना (Shivsena) पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. परंतु याबाबत स्वतः आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी स्पष्ट नकार देत मी शिवसेनेचा आमदार आहे आणि मी पक्ष बदलणार नाही, अशाप्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे.
याच वेळी त्यांनी याबाबत आपली स्पष्टीकरण दिले आहे. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर कोणतीही टीका केलेली नाही. मी फक्त त्यांच्याकडे एक छोटीशी मागणी केली आहे. तुम्ही जर मनात आणलं तर संपूर्ण राज्यातली जनता सुखी होऊ शकते. रयत शिक्षण संस्था कर्मचाऱ्यांच्या हातात द्या आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्या संस्थेचे अध्यक्षपद द्या, अशी छोटीशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. जर राज्य सरकार त्या संस्थेला पैसे देत असेल तर राज्य सरकारचा मुख्यमंत्री त्या संस्थेचा अध्यक्ष असायला पाहिजे. हाच नियम स्वामी संस्थेलाच लागू आहे. रयत शिक्षण संस्था आणि स्वामी संस्था या राज्याच्या खुप मोठ्या संपत्ती आहेत. त्या संपत्तींच खासगीकरण होणे हे क्लेशदायक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही महेश शिंदेंनी रयत शिक्षण संस्थेच्या खासगी करणावर भाष्य केलं होतं. रयत शिक्षण संस्थेचे (rayat shikshan sanstha) संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील (karmaveer bhaurao patil) यांनीच संस्थेसाठी घटना लिहिली होती. त्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या घटनेत बदल केला. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होऊ नये, ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या संचालक मंडळावर घेतलं जातं याचं दुःख वाटतं, असंही त्यांनी म्हटलं होतं अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
शरद पवारांनी वंशपरंपरेने पुढील पिढीला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद दिल्यास संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज रयतमध्ये नोकरी देण्यासाठी खुलेआम 40 लाख रुपयांची मागणी केली जाते. अशातच बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही महेश शिंदेंनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.