Samadhan Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पावसातील सभा समाधान आवताडेंना विजयापर्यंत नेणार का?

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपावसात मरवडे येथे प्रचारसभा घेतली.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील (Satara) भरपावसातील सभेने २०१९ मध्ये राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यानंतर अनेकांनी पावसात सभा घेतल्या. आता मंगळवेढ्यातही (Mangalveda) आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपावसात मरवडे येथे प्रचारसभा घेतली, त्यामुळे पावसातील ही सभा फलदायी ठरणार का? याकडे मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Will Rally in the rain lead Samadhan Avtade to victory?)

विधानसभेतील दोन निवडणुकीतील पराभवानंतर समाधान आवताडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी समझोताचे राजकारण करून प्रशांत परिचारक यांच्या मदतीने २०१९ ची पोटनिवडणूक जिंकली. मात्र, त्यांच्या विजयाने भाजपच्या १०५ घरी बसलेल्या सदस्यांमध्ये १०६ वा सदस्य झाला तरीही तो विरोधातलाच म्हणून त्यांना हिणवले गेले. पण, पोटनिवडणुकीत झालेल्या करेक्ट कार्यक्रमाचे रूपांतर नुकतेच राज्यात झाले. राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे समाधान आवताडे सत्ताधारी पक्षाचे आमदार बनले.

राज्याच्या राजकीय धामधुमीत दामाजी कारखान्याची निवडणूक सुरू आहे. आमदार आवताडे यांचा राजकीय वारू रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी समविचारी गटाच्या रूपाने त्यांना विरोध चालवला आहे. ती कोंडी फोडण्यासाठी आवताडे सध्या नेटाने प्रयत्न करीत आहेत, त्यामध्ये रड्डे, हुन्नूर, लक्ष्मी दहिवडी, पाटकळ, अरळी, मरवडे येथे नव्या कार्यकर्त्यांचा गटात प्रवेश करून घेतला आहे.

आमदार समाधान आवताडे हे राजकीय कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच आज वेतनावरून कामगारांनी कारखाना कार्यस्थळावर आंदोलनाचे हत्यार उपसले. त्याला मरवडेच्या सभेत प्रत्युत्तर देत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे समविचारी गटाच्या नेत्यांचा हात असून त्यांनीच कर्मचाऱ्यांना हे आंदोलन करण्यासाठी परावृत्त केले आहे, असा आरोपही आवताडे यांनी केला. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून पावसातील सभा ही राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय झालेला आहे. पावसातील सभा अवताडे यांना विजयापर्यंत नेणार का, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT