MLA Shahaji Patil Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जीवात जीव असेपर्यंत दीपक आबांना अंतर देणार नाही : शहाजीबापू

Shahaji Patil : ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला : दीपक आबा आणि माझे राजकीय मतभेद असले तरी आम्ही सख्ख्या भावाप्रमाणे राहिलो आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कधीच दिपक आबांना अंतर देणार नाही आणि कधीच त्यांना दुखावणार नाही, असे भावनिक वचन शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.

सांगोला तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मंगळवार (ता. 6 ऑगस्ट) रोजी जवळा (ता. सांगोला) येथे त्यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहताना आमदार शहाजीबापू (Shahaji Patil) बोलत होते. (MLA Shahaji Patil Latest News)

यावेळी पंढरपूरचे युवराज पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शेकापचे चंद्रकांत देशमुख, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, दिपक पवार, गणेश पाटील, राजेश भादुले, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, चंदन होनराव, सी. पी. बागल, मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगरसेवक आनंदा माने, माजी सभापती संभाजी आलदर, बाळासाहेब काटकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, अरुण शेंडे, माजी उपसभापती संतोष देवकते, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, राजकुमार पवार, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, शिवाजी बनकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, अभिषेक कांबळे, माजी शिक्षण सभापती साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नवनाथ लवटे, शंकर ढाळे, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण, माजी सरपंच प्रकाश केदार, श्री संत बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब खरात, मनसेचे विनोद बाबर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, माजी जिल्हा परिषद सभापती अनिल मोटे, उत्तम खांडेकर, मारुती ढाळे, सतीश वाघ, प्रा. संजय देशमुख, गजानन भाकरे, अनिल इंगवले, गजानन बनकर, भारत बनकर, दत्ता सावंत, गणेश कांबळे, जालिंदर ढेरे, रफिक शेख, बापूसो ठोकळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी कल्याणराव काळे, दादासाहेब साठे, अनिल सावंत, यशवंत कुलकर्णी, चंद्रकांत देशमुख, राजकुमार पवार, दिलीप धोत्रे, दीपक पवार, गुलाबराव कोडग, सुभाष लऊळकर, शिवाजीराव गायकवाड, सुभाष जाधव, प्रा. जयप्रकाश बिले, शिवाजीराव कोळेकर, डॉ बंडगर सर, तानाजी बाबर आदींनी आपले विचार व्यक्त करताना काकींच्या आठवणी जागवल्या व सांगोला तालुक्यात पुन्हा स्व. काकीसारखे व्यक्तिमत्व जन्माला यावे अशी प्रार्थनाही यावेळी सर्वांनी केली.

आपल्या आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरीही स्व. काकींनी कधीही आपल्या विचारांशी आणि आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही. काकींनी जी संस्काराची शिदोरी आणि स्वर्गीय काकांनी जो विचारांचा वारसा आपणास दिला आहे तोच यापुढील काळात पुढे घेऊन जाणार आहे, असे मत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT