बारामतीत ताकद लावून भाजप शरद पवारांच्या प्रयत्नांना शह देण्याच्या तयारीत

निर्मला सीतारामन यांचे आगामी दोनशे दिवसांत पाच ते सहा दौरे होतील. प्रदेशाध्यक्ष स्वताः तीन महिन्यांतून एकदा बारामतीला येतील. प्रभारी राम शिंदे लक्ष केंद्रीत करतील. मंत्रीस्तरावर राधाकृष्ण विखे पाटलांवर बारामतीची जबाबदारी देण्याची घोषणा करत बावनकुळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

बारामती : मिशन बारामतीचा (Baramati) प्रारंभ भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन करत केला. आगामी २०२४ च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघ काबीज करायचाच, या जिद्दीने भाजपने व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे आज स्पष्ट झाले. (State BJP president Chandrashekhar Bawankule's show of strength in Baramati)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भाजप नेतृत्वाने बारामतीची जबाबदारी सोपवली असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, असा निर्धार पक्षनेतृत्वाने केल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. ही निवडणूक गांभीर्याने घ्यायची हा संदेश प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा स्तरावरील सर्वच नेत्यांना दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करुन राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बारामतीवर लक्ष केंद्रीत करुन शह देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

Chandrashekhar Bawankule
गेल्या अडीच वर्षांत आम्ही एक जरी अर्ज दिला तरी तो फेकून दिला जायचा : हर्षवर्धन पाटलांनी मांडली खदखद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बावनकुळे, राम शिंदे यांच्यासह काही जणांवर खास या मतदारसंघाची जबाबदारी सोपवून कार्यकर्त्यांना ताकद देत वातावरण निर्मितीचा प्रयत्न अठरा महिने अगोदरच भाजपने सुरु केला आहे. राष्ट्रवादीच्या विसर्जनाची प्रदेशाध्यक्षांनी बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून दिलेली हाक राजकीयदृष्टया महत्वाची मानली जात आहे.

Chandrashekhar Bawankule
राज्यातील २८१ बाजार समित्यांमध्ये रंगणार रणधुमाळी; असा असेल निवडणूक कार्यक्रम

बारामतीच्या व्यासपीठावर भाजपच्या नेत्यांनी परिवर्तनाची हाक दिलेली असली तरी पवारांचे वर्चस्व असलेल्या या भागात विजय मिळविण्यासाठी भाजपला कमालीचे काम करावे लागणार, हे निश्चित आहे. केवळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असून चालणार नाही, त्यासाठी काम करण्याची गरज आहे. अनेक लाटेमध्येही बारामती लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी पवार कुटुंबियांवर विश्वास दाखविला, हा इतिहास नजरेआड करून चालणार नाही.

Chandrashekhar Bawankule
राष्ट्रवादीच्या विसर्जनाची सुरुवात बारामतीपासून करा : बावनकुळेंनी ललकारले

राष्ट्रवादीचा आगामी उमेदवार निश्चित आहे; पण भाजपकडे अद्यापही कोणाला संधी द्यायची याचीच, निश्चित नसल्याने वरिष्ठ स्तरावरुन उमेदवार ठरविला जाईल, असे प्रदेशाध्यक्षही म्हणाले. चेहराच निश्चित नसेल तर फक्त पक्षाच्या जिवावर निवडणूक लढविणे व शेवटच्या क्षणी संपूर्ण मतदारसंघात पोहोचणे अशक्य होते, त्या मुळे भाजप उमेदवार निश्चित करुन लढत देणार की ऐनवेळेस उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Chandrashekhar Bawankule
काँग्रेस नेते विश्वजित कदम भाजपत प्रवेश करणार?; स्पष्टीकरणामुळे पुन्हा वाढला संभ्रम

निवडणूक लढविताना बूथपासून लक्ष केंद्रीत करण्याचा महत्वाचा मुद्दा बावनकुळे यांनी अधोरेखीत करत तळातील कार्यकर्त्याला ताकद व सन्मान देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यांनी भाषणात फक्त कागदावरचे नियोजन नको; तर इमानदारीने काम करणारे कार्यकर्ते तयार करा, असे सांगत पक्षाची भूमिकाच स्पष्ट केली. ही लढाई जिंकायची असेल तर मतदारांचे मनपरिवर्तन करुन त्याचे रुपांतर मतपरिवर्तनात करण्याचा संदेशही त्यांनी दिला. पाच दशकांपासून वर्चस्व असलेल्या या भागाला बालेकिल्ला म्हणण्याबाबत भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली असली तरी प्रत्यक्षात ही लढाई वाटते तितकी सोपी नाही याची त्यांनाही कल्पना आहे.

Chandrashekhar Bawankule
राष्ट्रवादीचा बारामतीचा गड २०२४ मध्ये उद्‌ध्वस्त होईल आणि भाजप नक्की जिंकेल!

निर्मला सीतारामन यांचे आगामी दोनशे दिवसांत पाच ते सहा दौरे होतील. प्रदेशाध्यक्ष स्वताः तीन महिन्यांतून एकदा बारामतीला येतील. प्रभारी राम शिंदे लक्ष केंद्रीत करतील आणि मंत्रीस्तरावर राधाकृष्ण विखे पाटलांवर बारामतीची जबाबदारी देण्याची घोषणा करत बावनकुळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जिंकण्यासाठी लढायचं आहे, खुद्द नरेंद्र मोदी यांचीही सभा बारामतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असून राष्ट्रवादीची दबावतंत्राने कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणातील ताकद, अजित पवार यांचा राज्यातील दबदबा व सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील वजन या सर्वांचा विचार करुन भाजपने रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यावी, असे प्रदेशाध्यक्षांनी सुचविलेले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही या बाबत सूचना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

बारामती जिंकायची हा लाऊड आणि क्लिअर मेसेजच चंद्रशेखर बावनकुळे देऊन गेले आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ताकद लावून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आगामी काळात याबाबत नेमके काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com