shivendraraje, udyanraje  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale: लोकसभेत उदयनराजेंचा प्रचार करणार का ? शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्टच सांगितले....

Political News : स्‍थानिक विषय वेगळे आहेत. पालिका, बाजार समिती हा वेगळा विषय आहे.

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. विशेषतः या वेळेस महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता लागली आहे. त्यानंतर येथील उमेदवार ठरणार असला तरी आतापासूनच भाजपकडून उदयनराजेंनी तयारी सुरु केली आहे.

सातारा लोकसभेची जागा ज्‍याला जाईल त्‍यांचा महायुतीचा घटक म्‍हणून प्रचार करणे माझे कर्तव्‍य आहे. पक्षाने गतवेळी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे मी कोणताही इतर विचार न करता काम केले. माझ्‍या इतकीच मते त्‍यांना सातारा-जावलीत मिळाली. मी पक्षाला मानतो, पक्ष जो उमेदवार देईल त्‍याचे काम करणार. स्‍थानिक विषय वेगळे आहेत, असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

सातारा पालिकेत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे (Udaynraje bhosle) यांचा प्रचार करणार का, या प्रश्‍‍नावर ते म्‍हणाले, मी पक्षाचा आदेश मानतो. जागा कोणत्‍या गटाला जाते ते स्‍पष्‍ट व्‍हायचे. जागा ज्‍याला जाईल त्‍याचा महायुतीचा घटक म्‍हणून प्रचार करणे माझे कर्तव्‍य आहे, असे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाने गतवेळी त्‍यांना उमेदवारी दिली होती. त्‍यावेळी मी कोणताही इतर विचार न करता त्‍यांचे काम केले. माझ्‍या इतकीच मते त्‍यांना सातारा-जावलीत मिळाली. मी पक्षाला मानतो, पक्ष जो उमेदवार देईल त्‍याचे काम करणार. स्‍थानिक विषय वेगळे आहेत. पालिका, बाजार समिती हा वेगळा विषय आहे. बाजार समितीला त्‍यांनी विरोध केला, त्‍यांना निवडणुकीत उत्तर मिळाल्‍याची टिपणीही त्‍यांनी यावेळी केली.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT