Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटींवर भर दिला आहे. ते लोकसभा लढणार की नाही, हे आजही गुलदस्त्यात आहे. आज त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजपकडून उमेदवार कोण ? याची उत्सुकता ताणली आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क मोहीम हाती घेतली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामाबाबत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन ही सर्व कामे मार्गी लावली आहेत.
आता सातारा जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. काल वाई तालुक्यातील भुईंज (Bhuinj) येथील जेष्ठ नेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे यांनी भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुमारे अर्धातास दोन्ही नेत्यांत चर्चा झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी जुन्या आठवणीवरून आणि निवडणुकीतील जुन्या आठवणींवर गप्पा रंगल्या होत्या. प्रतापराव भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तसेच राजे यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतारा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. जोरदार तयारी करा, असा सल्ला दिला.
यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संघटक, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, मोहनराव भोसले, गजानन भोसले, ईशान भोसले, भुईंज विकास सेवा सो चेअरमन मदन शिंदे, आबासाहेब वीर पतसंस्था चेअरमन विलास जाधव, भुईंज तंटामुक्ती अध्यक्ष दौलनराव भोसले, माजी सरपंच अर्जुन भोसले, अनुराधा भोसले, वीर पतसंस्था व्हाईस चेअरमन रविंद्र मोसले, भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक ननावरे, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे उपस्थित होते.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.