Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : मराठा समाजाच्या अर्ज माघारीने निवडणूक रिंगणातील नेत्यांची धाकधूक झाली कमी

Maratha Community Candidate Withdrawal Election: मराठा समाजाने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यातच जरांगे-पाटील यांचा पुढील काहीच आदेश नसल्याने ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

हेमंत पवार - Hemant Pawar

Satara News : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजातील ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मतविभागणीचे संकट दोन्ही मतदारसंघातील प्रमुख लढतीतील उमेदवारांसमोर उभे राहिले होते. मात्र, संबंधितांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे घेतले.

त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील मतविभागणी टळली जाणार असल्याने प्रमुख लढतीतील नेत्यांची धाकधुक थोडी कमी झाली आहे. दरम्यान मराठा समाजाने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यातच जरांगे-पाटील यांचा पुढील काहीच आदेश नसल्याने ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

राजकीय पक्षांना धडा शिवकण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अंतरवाली-सराटी येथे बैठकही झाली होती. त्या बैठकीत जरांगे-पाटील (Manoj jarange Patil) यांच्या आदेशनुसार मराठा समाज बांधवानी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील प्रमुख लढत होत असलेल्या उमेदवारांपुढे मतविभागणीचे संकट उभे राहिले होते.

दरम्यान जरांगे-पाटील यांनी इतर समाज बांधवांची बैठक घेवुन पुढील दिशा ठरवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी बैठकही घेतली. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांनी काही मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मराठा समाजातील उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले.

मराठा समाजाची उमेदवारी असती तर प्रमुख लढतीतील नेत्यांना मतविभागणीचा फटका बसला असता. दोन्ही मतदार संघात चारही प्रमुख लढतीचे उमेदवार मराठा समाजाचे असले तरी समाजाकडुन उभ्या असलेल्या उमेदवारांचा विचार मराठा समाजाने करुन मतदान केले असते. त्याचा धोका प्रमुख उमेदवारांना होता. मात्र, जरांगे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्याने मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मतविभागणी टळणार असून दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची धाकधुक कमी झाली आहे.

दोन दिवसानंतर होणार निर्णय

मराठा समाजाकडुन ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे घेतले असून मराठा समाजाने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा समाज विधानसभा निवडणुकीत मतदान करेल, असे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT