Satara News : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला अश्लील फोटो पाठवून छळ केल्याचा आरोप आहे. या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली होती. त्याचवेळी गोरे यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
दुसऱ्या बाजूला आरोप करणाऱ्या पिडीत महिलेनेही गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अद्याप त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. 2019 मध्ये गोरे यांनी माफीनामा लिहून दिल्याने आणि दंडवत घातल्याने आपण गुन्हा मागे घेतला होता. मात्र अजूनही आपल्याला त्रास दिला जातोय. माझ्याबद्दल नको नको ते पसरवलं जातयं. त्यामुळे गोरेंविरोधात उपोषण करण्याचा इशाराही पिडीतेने साम मराठीशी बोलताना दिला आहे.
पिडीत महिला म्हणाली, हे प्रकरण 2015-2016 दरम्यानचे आहे. या काळात जयकुमार गोरे यांनी मला वेगवेगळे फोटो आणि मेसेजेस पाठवून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला होता. पण मी त्यांच्या मागणीला भीक न घालता तटस्थ राहिले. त्यामुळे त्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या होत्या. पण माझी त्यावेळीही एवढीच अपेक्षा होती की त्यांनी माफी मागावी. हा विषय इथेच संपेल.
त्यांनी त्याचवेळी जर माफी मागितली असती आता सुरू असलेला गदारोळ काहीच झाला नसता. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2016 रोजी मी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यावेळी त्यांनी सातारा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दहा दिवस ते तुरूंगातही होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्याविरोधात दोन कोटी खंडणीची तक्रार केली.
त्यानंतर तीन वर्षे मला टॉर्चर सुरूच होते. वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येणे, फोन येणे या गोष्टी सुरूच होत्या. 2019 रोजी निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री होण्याची संधी समोर दिसत असल्याने माझ्यावर दबाव आणला. माझ्या नातेवाईकांना संपर्क करून त्यांच्या मार्फत मला निरोप पोहचवले जाऊ लागले. यात माझ्या भावाने मला साथ दिली. त्याने या प्रकरणात आपण कायमचे गुरफटले जाऊ नये म्हणून केस मागे घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी 2019 ला केस मागे घेतली. .
पण केस मागे घेत असतानाही मी गोरे यांच्याकडे आधी माफी मागा अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी माफीनामा लिहून देत कोर्टाच्या चेंबरमध्ये दंडवत घातला होता. त्या माफीनाम्यात कोणताही त्रास दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यानंतरही आजपर्यंत मला त्रास दिला जातोय. माझ्याबद्दल नको नको ते पसरवलं जातयं. माझ्या नावे मुंबई-पुण्यात प्लॅट आहेत. मला गोरे यांनी दुबईला नेलं. पण दुबईला जाण्यासाठी माझ्याकडे पासपोर्टच नाही.
विविध मार्गांनी माझी बदनामी केली जात असून एका पत्रामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याची माहिती दिली होती. तसेच होण्याऱ्या त्रासाबद्दलही सांगितले होते. यानंतर त्यांनी मला जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे मी त्यांना भेटले होते. पण त्यात काहीच झाले नाही. यामुळेच आता कंटाळून मी 17 मार्चपासून मुंबईतील राजभवनासमेर उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्या महिलेनं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.