
Mumbai News : भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेल्या फोटा पाठवल्याच्या प्रकरणावरुन गंभीर आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणावरून विधानसभेत देखील सवार उठवण्यात आले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून जोरदार टीका देखील केली होती. यावर आता जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण देताना, कोर्टाने आपली 2019 मध्येच निर्दोष मुक्तता केली आहे. पण ज्यांनी आता हे प्रकरण उकरून काढत मला त्रास दिला आहे त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याबाबत तिने राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोध पक्षातील नेत्यांना पत्र पाठवले आहे. सध्या याच पत्रावरून आणि महिलेची होणाऱ्या बदणामीवरून एकच गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, “पश्चिम महाराष्ट्रातला रोज व्यायाम करणारा एक पैलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्यापुढे जाऊन 10 हजार रुपये दंड भरुन माफी मागतो. मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
तर संजय राऊत यांनी, फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेचा छळ आणि विनयभंग या मंत्र्याने केल्याचा आरोप केला होता. तसेच आता हे प्रकरण समोर आले असून ती अबला विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना लाथ मारून मंत्रिमंडळाबाहेर काढलं पाहिजे अशी टीका केली होती.
या टीकेनंतर आता जयकुमार गोरे यांनी, स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हे प्रकरण 2017 चे असून 2019 मध्ये न्यायालाने माझी निर्दोष मुक्तता केलीय. पण आता सहा वर्षांनी हे प्रकरण विरोधकांनी काढले आहे. पण आता या प्रकरणावरून ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात हक्कभंगासह बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सात दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले असून मी काही भावनिक होण्यासाठी हे बोलत नाही. पण ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जन देखील मला करायला दिले नाही. विरोधकांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले. पण कोर्टाने निकाल देत माझी निर्दोष मुक्तता केली आहे.
तसेच या प्रकरणात जर खरचं त्या महिलेनं तक्रार केली असेल तर पोलिसांनी तपास करावा. पोलिसांनी मी दोषी असेन तर माझ्यावर अन्यथा जो कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी. पण या प्रकरणात आला माझ्यावर ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याविरोधात आजच हक्कभंग आणणार असल्याचा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. तर बदनामीचा खटला देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान जयकुमार गोरे यांनी, संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. गोरे म्हणाले, माझेही हिच मागणी आहे की, गोरेंनी त्रास दिला की नाही, याची पोलिसांनी चौकशी करावी आणि दोषींना कारवाई करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.