Karad Palika, Smita Hulvan karad reporter
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडची महिला, बालकल्याण समिती राज्यात अव्वल; प्रथम पुरस्कार जाहीर

कराड पालिकेत Karad Palika सभापती Sabhapati स्मिता हुलवान Smita Hulvan यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे Womans and Child Walfare Department सभापती म्हणून काम करताना विविध योजना व उपक्रम राबवले होते.

- सचिन शिंदे

कऱ्हाड : कराड पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने 2017 ते 2018 या सालात केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतली आहे. संस्थेने ब वर्ग पालिका गटात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. 2017 पासून सभापती स्मिता हुलवान यांनी महिला व बालकल्याणचे सभापतीपद सलग चार वर्षे भुषवले आहे. सभापती म्हणून सौ. हुलवान यांच्या कामाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने राज्य पातळीवर घेतली आहे.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर परिषद, नगरपरिषद महासंघ यांनी 2014 पासून राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. 2017-18 आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यातील पालिकांच्या महिला व बालकल्याण समित्यांकडून विहित नमुन्यात माहिती मागवली होती.

पुरस्कारासाठी समित्यांची निवड करण्यासाठी अनुभवी नगरसेविकांची समिती नेमली होती. त्या समितीने ब वर्गात कऱ्हाड पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला. पालिका व नगरपंचायत गटात पहिले तीन व उत्तेजनार्थ असे एकूण 13 पुरस्कार जाहीर केले आहेत. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी याबाबतचे पत्र कराड नगरपालिकेस पाठवले आहे.

कराड पालिकेत सौ. हुलवान यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी विविध योजना व उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने महिलांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण तसेच मोफत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण त्यांच्या समितीमार्फत देण्यात आले होते. महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी या समितीने विविध उपक्रम राबवले आहेत. चार वर्षांत या समितीला वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT