Minister Gulabrao Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : चार पाच डाकूंकडूनच उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग : गुलाबराव पाटील यांची टीका

Gulabrao Patil सातारा जिल्ह्यातील ८०० पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Umesh Bambare-Patil

Satara News : उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये हेच चार पाच डाकू होते. 'डाकू' हा शब्द असंसदीय असल्याने त्याची वाच्यता होईल. पण, याच लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे. कधी नगरसेवक ही न झालेले राऊत Sanjay Raut आता आमच्यावर टीका करतायत, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील ८०० पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश शिंदे, जिल्हाधिकार रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, महादेव घुले, एसपी समीर शेख, पुरुषोत्तम जाधव, निलेश मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊतांवर टीका केली.

खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या गर्दीच्या फोटोबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, यावर उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील हे राऊतांना डाकू म्हणाले. गर्दी जमवणारे लोक तुम्ही वापस पाठवली आणि आता दुसऱ्यांची गर्दी दाखवून काय उपयोग आहे. तडीपाऱ्या,खून प्रकरणात आम्हाला खोटं अडकवलं गेलं.

जेलमध्ये वर्षे वर्षे आम्ही राहिलो आणि आज तुम्ही वल्गना करतायत, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, कधी नगरसेवक न झालेला हा माणूस आमच्यावर टीका करतोय. खरं तर उद्धव ठाकरे यांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये हेच चार पाच डाकू होते. 'डाकू' हा शब्द असंसदीय असल्याने त्याची वाचत्या होईल.पण, याच लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT