Satara : अण्णासाहेब महामंडळाला भरघोस निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही : नरेंद्र पाटील

Eknath Shinde सह्याद्री अतिथिगृहात काल (शनिवारी) मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली.
Narendra Patil, Eknath Shinde
Narendra Patil, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Dhebewadi News : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी दिली.

नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथिगृहात काल (शनिवारी) मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुण उद्योजक उभे राहात आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार सुरू आहे. याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.

महामंडळासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे जागा देण्यात येणार असल्याचे सांगितले. नरेंद्र पाटील म्हणाले, या महामंडळाच्या भाग भांडवलाबाबतची उपलब्धता, तसेच मंडळाच्या वित्त पुरवठ्याच्या अटींबाबत आणि अन्य बाबींबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीकडेही पाठपुरावा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Narendra Patil, Eknath Shinde
Narendra Patil News : दंड थोपटत नरेंद्र पाटलांनी आपल्याच सरकारला नमवलं!

सारथीसाठी मोठ्याप्रमाणात निधीची तरतूद करण्यात येणार असून, त्यासाठी योजनांची व्याप्ती वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार या दृष्टीने शासनाकडून सकारात्मक पावले पडताना दिसत आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्ये आता आणखी सुधारणा व बदल झाले असून, कर्ज मर्यादा १५ लाख रुपये केली आहे. परतफेडीचा कालावधीही वाढला आहे.

Narendra Patil, Eknath Shinde
Delhi-Mumbai Express way : मुंबई-दिल्लीचे अंतर लवकरच १२ तासांचं; मोदी करणार 'या' टप्प्याचं उदघाटन

मध्यंतरी या महामंडळाकडे तत्कालीन राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने मराठा समाजावर अन्याय झाला. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास लक्ष घालून अडचणी सोडवायला प्राधान्य दिल्याने आता निधीचा तुटवडा जाणवणार नाही. महामंडळाच्या विविध योजना गावोगावी पोचवून मराठा समाजातील उद्योजक पिढी उभी करण्यासाठी माझे राज्यातील विविध जिल्ह्यांत दौरे सुरू आहेत. बँकांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शंका व अडचणींचे सर्वांसमक्ष निरसन केले जात आहे.’’

Narendra Patil, Eknath Shinde
तर लाभार्थी मराठा युवक मंत्र्यांना अडवून जाब विचारतील : नरेंद्र पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com