Yashvantrao Gadakh Vinayak Darandale
पश्चिम महाराष्ट्र

यशवंतराव गडाख म्हणाले, मिठाच्या खड्यापासून सर्वांनी सावध रहा

मुळा साखर कारखान्याच्या ( Mula sugar factory ) 44 व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन नंतर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते व कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) बोलत होते.

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील विविध निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. या दृष्टीने विविध राजकीय पक्ष तयारी करत आहे. नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही कार्यकर्त्यांना त्यांचा अनुभवी सल्ला दिला. मुळा साखर कारखान्याच्या 44 व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. Yashwantrao Gadakh said, everyone beware of salt stones

यशवंतराव गडाख म्हणाले, "मुळा साखर कारखान्यासह सर्वच संस्थेचा चांगला कारभार आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या पदामुळे सारेच काम चुटकीसरशी मार्गी लागत असुन विकास कामात सध्या तालुक्याचे पाचही बोटे तुपात असताना मिठाचा खडा टाकणाऱ्यापासून सावध राहणे आवश्यक आहे." असा सल्ला 'मुळा'चे संस्थापक यशवंतराव गडाख यांनी दिला.

मुळा कारखान्याची आर्थिक स्थिती उत्तम असुन वीज निर्मिती, डिस्लरी प्रकल्प बरोबरच पुढील महिन्यात शंभर कोटी रुपये खर्चाचा इथोनॉल प्रकल्प सुरु होत आहे, असे सांगून गडाख यांनी 44 वर्षांत पोटच्या मुलाप्रमाणे संस्था जपून एकही डाग लावू दिला नसल्याचे सांगितले.

या प्रसंगी सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख, 'मुळा'चे माजी उपाध्यक्ष जबाजी फाटके, माजी सभापती कारभारी जावळे, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, युवानेते उदयन गडाख, दिलीप मोटे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त कामगारांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या सूचनेनंतर प्रथमच बाॅयलर पूजनाचा कार्यक्रम संचालका ऐवजी सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. अरुण सांवत, डाॅ.ज्ञानेश्वर दरंदले, रामनाथ पवार महाराज व मदन डोळे यांच्या हस्ते सपत्निक पूजा करुन अग्नी प्रदिपन करण्यात आला.

प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी यावर्षी पासून सात हजार टनी यंत्र सुरु होवून पंधरा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.चंद्रकांत आढाव, अॅड.बापुसाहेब गायके,असरु सानप,पवार महाराज यांचे भाषण झाले.

शाबासकीची थाप..

संस्थापक यशवंतराव गडाख यांनी योग्य वेळी साखर एक्स्पर्ट केल्याने संस्थेला 25 कोटीचा फायदा झाल्याचे सांगून कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, चिफ अकौंटंट हेमंत दरंदले व अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत शबासकी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT